बॉलिवूड व मराठी सिनेइंडस्ट्रीत झळकलेल्या या  'गर्ल इन द सिटी' आणि 'लिटील थिंग्स' या वेबसिरीजमधील भूमिकांमुळे ‘वेब क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मिथिला पालकर हिने मराठी सिनेसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये कमी कालावधीत आपली ओळख निर्माण केली आहे. तिने कारवां या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तर मराठीत मुरांबा या चित्रपटातून रसिकांना चांगलीच भुरळ पाडली. ती नेहमी तिच्या भूमिकांमुळे चर्चेत येते.  नुकतेच तिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ती निरमा साबणावरील निरमा गर्ल सारख्या गेटअपमध्ये पहायला मिळते आहे.

मिथिला अभिनेता अभय देओलसोबत नेटफ्लिक्सवरील सिनेमा 'चोपस्टिक'मध्ये झळकणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला.

या सिनेमााची कथा मुंबई शहराशी निगडीत असून मिथिला आणि अभय चोरी झालेल्या कारचे प्रकरण सोडवताना पहायला मिळत आहेत. या सिनेमात मिथिला निरमाच्या भूमिकेत दिसणार आहे. जी चीनी यात्रीकरूंना मार्गदर्शन करताना दिसणार आहे. निरमा ही डरपोक मुलगी आहे. जेव्हा तिची नवीन कार चोरीला जाते. त्यावेळी ती खूप त्रस्त होते. त्यावेळी अभय देओल तिची कार शोधून देण्यासाठी मदत करतो. ती कार शोधण्यासाठी ते आपल्या प्रवासात बकरीसोबत टीम बनवतात.

या चित्रपटात मिथिला व अभय यांच्याव्यतिरिक्त विजय राज देखील मुख्य भूमिकेत आहे. 'चोपस्टिक' हा सिनेमा ३१ मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

कदाचित 'चोपस्टिक' सिनेमात मिथिला साकारीत असलेल्या पात्राचे नाव निरमा असल्यामुळे कदाचित तिने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला असेल.