मयूर तिरमखे फिल्म्स निर्मित आणि मोहम्मद बर्मावाला दिग्दर्शित 'लग्नकल्लोळ' हा चित्रपट येत्या काही महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

लग्न हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील अविस्मरणीय असा क्षण असतो. याच संकल्पनेवर आधारित 'लग्नकल्लोळ' हा धमाल विनोदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

मयुरी देशमुख

सिद्धार्थ जाधव, भूषण प्रधान, मयुरी देशमुख यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'लग्नकल्लोळ' हा धमाल विनोदी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात कसलेल्या कलाकारांची फौज असल्याने हा नक्कीच धमाकेदार चित्रपट असेल. नावावरूनच हा चित्रपट लग्न या विषयावर आधारित असेल हे तर नक्की.  मोहम्मद बर्मावाला यांनी यापूर्वी दिग्दर्शक अब्बास -मस्तान यांच्यासोबत सुमारे तीन दशके काम केले आहे. त्यांनी बाजीगर, बादशाह , रेस आणि अशा अनेक सुपरहिट चित्रपटांसाठी सह-दिग्दर्शक आणि कार्यकारी निर्माता म्हणून काम पहिले आहे. या चित्रपटात भारत गणेशपुरे,प्रिया बेर्डे, प्रतीक्षा लोणकर,सुप्रिया कर्णिक, विद्या करंजीकर, अमिता कुलकर्णी, संतोष तिरमखे आणि डॉ. आशिष गोखले हे कलाकार देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे लेखन जितेंद्र परमार यांनी केले असून प्रफुल- स्वप्नील यांनी संगीत दिले आहे. मंदार चोळकर आणि जय अत्रे यांनी चित्रपटातील गाण्यांना शब्दबद्ध केले आहे.