काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तिवरे धरण फुटलं.  रात्री नऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली. यामध्ये 24 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. सध्या घटनास्थळी एनडीआरएफच्या पथकाकडून मदतकार्य सुरू असून आतापर्यंत नऊ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. धरण फुटीमुळे भेंडेवाडी, तिवरे, आकले, कादवस, नांदिवसे, दादर, गानेखडपोली या गावांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तर या धरणाला तडे गेल्याबाबत गावकऱ्यांनी तक्रार केली होती, अशी कबुली राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.

tweet

तिवरे धरणाच्या या अपघातानंतर मराठी व हिंदी अभिनेते जितेंद्र जोशीने एक संतप्त सवाल आपल्या सोशल मीडियावर ट्वीट करून  केला.  त्याचा हा सवाल रास्त असल्याचे नेटिझन्सचे म्हणणे आहे. त्याने ट्वीटमध्ये लिहिले आहे की, अवघ्या 20 वर्षापूर्वी बांधलेलं तिवरे धरण फुटतं? 9 जण मृत्युमुखी! 24 जण बेपत्ता... आसपासच्या गावकऱ्यांनी तक्रार करूनही याची दखल घेतली गेली नाही. हा वध आहे की खून? की दुर्लक्षिलेला मृत्यू!!

jitendra

 जितेंद्र जोशीने ह्या आधी छब्बीस ग्यारा तसेच सेक्रेड गेम्स मधेही महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.