मराठी इंडस्ट्री मधील सुप्रसिद्ध अभिनेता व आपल्या भन्नाट विनोदांनी हसवणारा अभिनेता.वैभव मांगले सध्या वैभवच्या चिंची चेटकीणीची जादू मराठी रंगभूमीवर सर्वदूर पसरली आहे. लहान मुलांपासून आबालवृध्दांपर्यंत प्रत्येकालाच वैभवच्या चिंची चेटकीणीने भुरळ पाडली आहे.  या चिंची चेटकीणीला नाट्यगृहात पाहण्यासाठी सध्या हाऊसफुल्ल गर्दी होत आहे. यात मराठी  नुकतंच या चिंची चेटकीणीची मजा अनुभवायाला अभिनेते सचिन पिळगांवकर आणि सुुप्रिया पिळगांवकर यांची खास उपस्थिती होती. लहान मुलांबरोबरच त्यांच्या पालकांसोबत सचिन आणि सुप्रिया यांनी चिंची चेटकीणीची मजा खूपच एन्जॉय केली. सुप्रिया पिळगांवकर तर चिंची चेटकीणीच्या इतक्या प्रेमात पडल्या की स्टेजवर येऊन त्यांनी वैभव मांगले आणि सहकलाकारांबरोबर चिंची चेटकीणीच्या गाण्यावरच फेर धरला. इतक्या मोठ्या अभिनेत्रीने दिलेली दिलखुलास दाद पाहून स्टेजवरच नाही तर प्रेक्षागृहातील सर्व उपस्थित मंडळी अवाक झाली होती. सचिन पिळगांवकरांनीही चिंची चेटकीणीच्या अदाकाराची जमके तारीफ केली. वैभव मांगलेची प्रमुख भूमिका असलेलं अलबत्या गलबत्या हे धमाल बालनाट्य सध्या मराठी रंगभूमीवर तुफान लोकप्रिय आहे.नुकतीच या बालनाट्याचे ३०० प्रयोग पूर्ण झाले आहेत.