आदिनाथ कोठारे' दिग्दर्शित 'पाणी' या अगामी चित्रपटासाठी १९व्या न्यूयॉर्क इंडिया फ्लिम फेस्टिवल मध्ये आदिनाथला 'सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार' देण्यात आले आहे.  पाण्याच्या समस्येवर भाष्य करणाऱ्या ‘एक होतं पाणी’चा टीझर हि प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे भरपूर कौतुक होत आहे.

लहानपणापासून अभिनयाची आवड असलेला आदिनाथने 'छकुला' ह्या चित्रपटामध्ये बालकलाकाराची भूमिका  निभावली होती...व त्या चित्रपटाला भर्गोच प्रतिसात अनवट, झपाटलेला २, दुभंग, माझा छकुला, वेड लावी जिवा, शुभमंगल सावधान, स्टँडबाय, हॅलो नंदन इत्यादी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनय कालबाजीने सर्वांचीच मने जिंकली आहेत. आदिनाथ नेहमी  सोशल मीडियावर अपडेटेड असतो, दररोज त्याच्या आयुष्यातील छोट्या मोठ्या आंनदी किंवा वाईट अश्या काही घडामोडी आपल्याजवळ इंस्टाग्राममार्फत शेअर करतो. नुकताच आपल्या इन्स्टाग्राम त्यांनी त्याच्या आयुष्यातील एक महत्वाची बातमी सांगितली आहे, त्याला मिळाल्या  सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्काराची  विडिओ आणि आपल्या हातात पुरस्कार असलेला फोटाज त्यांनी शेअर केले आहे. व त्यावर त्यांनी असेही लिहिले आहे कि, ही माझ्यासाठी खास वाढदिवसाची भेट आहे! मला नुकताच न्यूयॉर्ककडून एक कॉल आला आहे की माझ्या आगामी मराठी चित्रपट "पाणी" साठी प्रतिष्ठित १९ वा न्यूयॉर्क युनिक इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये मला सर्वोत्कृष्ट अभिनेतेचा पुरस्कार मिळाला आहे !!! माझ्या वतीने पुरस्कार प्राप्त करण्यासाठी अखौरीचे आभार!, त्याने सन्मानित आणि नमस्कार हि केला आहे. व प्रत्येकास धन्यवाद हि केले आहे....

१९ व्या न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये माझ्या आगामी चित्रपटासाठी 'सर्वोत्कृष्ट अभिनेता' पुरस्कार जिंकण्यासाठी सन्मानित आणि नमस्कार हि केला आहे !!! यामुळे माझा वाढदिवस आणखी खास बनला आहे !!! ज्युरी आणि प्रत्येकास धन्यवाद......

अलीकडेच ‘एक होतं पाणी’ चित्रपटाने ‘ अंबरनाथ चित्रपट महोत्सवा’त ६ नामांकनं मिळवली होती. त्यातील २ पुरस्कारांवर म्हणजेच ‘सर्वोत्कृष्ट कथा-आशिष निनगुरकर’ आणि ‘सर्वोत्कृष्ट बालकलाकार चैत्रा भुजबळ’ या पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवण्यात यशस्वी झाले. तसेच नोएडा येथे संपन्न झालेल्या 6 व्या नोएडा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाला “दखलपात्र ज्युरी पुरस्कार” मिळाला. दर्जेदार निर्मितीमूल्य, उत्तम कथानक आणि प्रतिभावान कलाकार यांचं समीकरण एकदा जुळून आलं की सुजाण रसिक-प्रेक्षकांच्या कौतुकाची थाप ही ठरलेलीच. ‘एक होतं पाणी’च्या बाबतीत नेमकी हीच बाब विशेष उल्लेखनीय ठरतेय. आशिष निनगुरकर यांच्या लेखणीतून साकारलेला हा विषय समाजाच्या डोळ्यांत अंजन घालणारा असून सद्यस्थितीला धरून आहे.

‘एक होतं पाणी’ या चित्रपटात आदिनाथ कोठारे, हंसराज जगताप, उपेंद्र दाते, अनंत जोग, जयराज नायर, गणेश मयेकर, रणजित जोग, श्रिया मस्तेकर, रणजित कांबळे, त्रिशा पाटील, शीतल कल्हापुरे, शीतल शिंगारे, आनंद वाघ, नाना शिंदे, अनुराधा भावसार, डॉ राजू पाटोदकर, राधाकृष्ण कराळे, दिपज्योती नाईक, बालकलाकार चैत्रा भुजबळ आदि कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका पाहायला मिळतील. या चित्रपटाचे छायाचित्रण योगेश अंधारे यांनी केले असून हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

एका दुष्काळग्रस्त गावाची गोष्ट सांगणारा, व पाण्याच्या  समस्येवर भाष्य करणाऱ्या ‘एक होतं पाणी; हा चित्रपट प्रत्येकाला पाण्याचा प्रश्न गंभीर होईपर्यंत वाट न पाहता पाणी वाचवले पाहिजे असा मौलिक संदेश देतो.