वेगवेगळ्या विषयांवर आधारीत  जसे मुरंबा, फास्टर फेणे असे सिनेमा केलेला अभिनेता अमेय वाघ आता एक नवीन स्टोरी सगळ्यांसमोर घेऊन येत आहे.आणि तो म्हणजे गर्लफ्रेंड.

गर्लफ्रेंड

नुकतेच ह्या सिनेमाचे टिझर सोचल मीडिया वर रिलीज करण्यात आले. त्यात अमेय एका साध्या मुलाच्या भूमिकेत दिसत आहे. जो दारूच्या नशेत आरश्या समोर उभा राहून "मी गर्लफ्रेंड पाठवणार" असे रंगात बोलत असतो. ह्या सिनेमात अमेय चा एक वेगळाच लुक सगळ्यांना बघायला मिळणार आहे. गर्लफ्रेंड ह्या सिनेमाच्या टिझर मध्ये अमेय हा एका साध्या आणि अभ्यासू मुलाच्या अवतारात दिसत आहे. नुकतेच गर्लफ्रेंड चे पहिले पोस्टर ही रिलीझ करण्यात आले होते. ह्या मध्ये अमेय एक  साधा चष्मा घालत उभा असतो व बाजूला एका मुलीची प्रतिकृती आपल्याला बघायला मिळते. तर ती मुलगी नेमकी कौन ह्या कडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले आहे.  तसेच ह्या सिनेमाचा लेखन आणि दिग्दर्शन उपेंद्र सीधेय यांनी केले आहे. तसेच ह्यूज प्रोडूकशन आणि प्रतिसाद प्रोडूकशनने ह्या सिनेमाची प्रस्तुती केली आहे.

अमेय वाघ

अमेय नेहमीच त्याच्या सिनेमांमध्ये वेगवेगळे व  नवीन रोल प्ले करत असतो. तसेच आता ह्या सीनेमातही  त्याचा आणखी कुठला नवीन अवतार पाहायला  मिळायला मिळणार ह्या कडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले आहे.