जय मल्हार या लिकेतील खंडेराया या भूमिकेमुळे देवदत्त नागे हे नाव घराघरात पोहोचले. त्याच्या जय मल्हार या मालिकेने काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. तरी आजही प्रेक्षकांच्या मनात या मालिकेतील त्याची व्यक्तिरेखा ताजी आहे. या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिले होते. खंडोबा या व्यक्तिरेखेला तर चाहत्यांचे विशेष प्रेम लाभले होते. देवदत्तने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. आता देवदत्तचे चाहते त्याच्या आगामी प्रोजेक्टची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

देवदत्त नागेच्या

देवदत्त नागे गेल्या कित्येक दिवसांपासून कोणत्या चित्रपटात अथवा मालिकेत झळकलेला नाहीये. पण त्याच्या फॅन्ससाठी एक गुड न्युज आहे. तो लवकरच एका हिंदी चित्रपटात झळकणार असल्याचे म्हटले जात आहे. त्याने नुकताच त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे हा अंदाज लावला जात आहे. त्याने नुकताच त्याच्या इन्स्टावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत आपल्याला त्याच्या हातात एक कप पाहायला मिळत आहे. या कपवर अजय देवगण फिल्मस असे लिहिलेले असून त्या फोटोसोबत त्याने इट्स कप ऑफ टी... 10 जानेवारी 2020 असे लिहिले आहे. यावरून अजय देवगण फिल्मच्या 10 जानेवारीला प्रदर्शित होत असलेल्या चित्रपटात तो काम करत असल्याचा आपण नक्कीच अंदाज लावू शकतो.

ff

अजय देवगण प्रॉडक्शनचा बिग बजेट सिनेमा तानाजी द अन्संग वॉरिअर 10 जानेवारी 2020 लाच प्रदर्शित होत आहे. त्यामुळे तुमचा लाडका देवदत्त तुम्हाला तानाजी मध्ये एखाद्या महत्त्वाच्या भूमिकेत दिसला तर आश्चर्य वाटून घेऊ नका... देवदत्तच्या या पोस्टबाबत त्याला विचारण्यासाठी आम्ही त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

आता खरंच देवदत्त तानाजी द अन्संग वॉरिअर या चित्रपटाचा भाग आहे की नाही हे आपल्याला तोच सांगू शकतो. पण तानाजी सारख्या बिग बजेट चित्रपटात त्याच्या फॅन्सना त्याला पाहायला मिळाले तर त्यांना प्रचंड आनंद होणार यात काहीच शंका नाही.