असे  म्हटले जाते के बॉलीवूड मध्ये काम करण्यासाठी  देशभरातून, वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक आपले नशीब आजमावायला येतात. तिथेच  काही अभिनेत्री आशाही आहेत ज्यांचा जन्म महाराष्ट्रातच झाला  असून कोणाचाही सपोर्ट नसतांनाही आपली छाप फक्त देशातच नव्हे  तर संपूर्ण जगभरात पाडली.

नूतन

नूतन


नूतन चा जन्म ४ जून १९३६  मध्ये झाला होता. नूतन  हिन्दी सिनेमा मधील एक  प्रसिद्ध अभिनेत्री होती. नूतन च्या सौंदर्याला मिस इंडिया चे पुरस्कार ने संभोजीतही केले होते. नूतन ने हिंदी सिने इंदूस्ट्रीत पन्नास पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केले होते. त्या सहित अनेक प्रकारचे अवॉर्ड्स ही त्यांना मिळाले होते.

माधुरी दीक्षित

माधुरी दीक्षित


 माधुरी दीक्षित नेने (विवाह नंतरचे नाव ). बॉलिवूड इंडस्ट्रीची अभिनेत्री, माधुरीचा जन्म १५ मे १९६७ मध्ये झाला.  तिने आपल्या कॅरियर ची सुरुवात १९८४ मध्ये "धर्म अबोध" मधून केली, पण १९८८ च्या तेजाब मूवी मधून माधुरी ला एक नवीन ओळख मिळाली. तेजाब मधल्या आयटम सॉंग मुळे ती  मोहिनी म्हणून ही ओळखु लागली. माधुरी ९० च्या दशकातली हाय  पेड एक्टरेससेसपैकी  एक होती. तिने तिच्या अभिनयसोइबत नृत्यासाठी अनेक अवॉर्ड ही मिळवले.

राधिका आपटे

राधिका आपटे


 राधिका आपटे चा जन्म ७ सप्टेंबर १९८५,पुण्यात झाला. राधिकाने मराठी सह हिंदी, मल्याळम तेलगू सारख्या भाषांच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.  मध्ये अनेक भाषामध्ये काम केले आहे. तीने श्रीराम राघवन द्वारा निर्देशित 'बदलापूर' मधेही काम केले. त्या सहित राधिका आता बॉलीवूड मधील मोस्ट टॅलेंटेड एक्टरेससेस पैकी एक म्हणून ओळखली जाते.

तनुजा

तनुजा मुखर्जी


  तनुजा मुखर्जी,  चा जन्म २३ सप्टेंबर १९४३ मध्ये झाला. तनुजा ही भारतीय चित्रपट-अभिनेत्री आहे. तिने हिंदी, मराठी, बंगाली भाषांमधील चित्रपटांत अभिनय केला आहे. त्यांच्या आई शोभना समर्थ या बोलपटांच्या प्रारंभिक काळातील हिंदी-मराठी चित्रपटांतल्या अभिनेत्री होत्या, तर काजोल व तनिशा या तिच्या दोन्ही मुलीही चित्रपटक्षेत्रातील नंतरच्या पिढीतल्या अभिनेत्री आहेत.

उर्मिला मातोंडकर

उर्मिला मातोंडकर


उर्मिला मातोंडकरचा जन्म 4 फेब्रुवारी १९७४ मध्ये झाला. उर्मिला ही हिंदी चित्रपटानं मध्ये काम करणारी अभिनेत्री आहे, तीने सलमान खान, शाहरुख खान व गोविंदा सारख्या मोठ्या अक्टर्स सोबत ही काम केले आहे. उर्मिला ने तीच्या फिल्मी कॅरियर ची सुरुवात बाळ कलाकार म्हणून १९९१ मध्ये 'कलयुग' सोबत केले. व एकसंपूर्ण अभिनेत्री म्हणून ती 'नरसिम्हा' चित्रपटातून आली. १९९५ मध्ये 'रंगीला', १९९७ मध्ये 'जुदाई' तसेच १९९८ मध्ये 'सत्या' मधल्या तीच्या कामाचे खूप कौतुक केले गेले.  ह्या चित्रपटांसाठी तिला काही पुरस्कांसाठी तीने अनेक पुरस्कार ही मिळवले होते.

दुर्गा खोटे

दुर्गा खोटे


दुर्गा खोटेचा जन्म १४ जानेवारी १९०५ मध्ये झाला होता. दुर्गा या मराठी अभिनेत्री होत्या. १९३२ सालच्या 'अयोध्येचा राजा' या मराठीतील पहिल्या बोलपटात प्रमुख भूमिकांपैकी राणी तारामतीची भूमिका यांनी केली होती. १९४२ भरत मिलाप  चित्रपटात कैकेयी, तर १९६० मध्ये मुघल-ए-आझम  चित्रपटात जोधाबाई, इत्यादी यांनी रंगवलेल्या भूमिका देखील विशेष गाजल्या. सुमारे पाच दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत यांनी मराठी व हिंदी भाषांतील अनेक चित्रपट व नाटकांतून भूमिका केल्या. १९६८ साली पद्मश्री पुरस्कार, तर  १९८३ साली दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन यांना गौरवण्यात आले.

पद्मिनी कोल्हापुरे

पद्मिनी कोल्हापुरे


पद्मिनी कोल्हापुरेचा जन्म १ नोव्हेंबर १९६५ मध्ये झाला. पद्मिनी  या एक हिंदी चित्रपटांत काम करणार्‍या मराठी अभिनेत्री आहेत. १९८०च्या दशकादरम्यान त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये नायिकेच्या भूमिका केल्या होत्या.'जमाने को दिखाना है, प्रेम रोग, सौतन इत्यादी. यशस्वी चित्रपटांमध्ये त्यांची कामे आहेत.पद्मिनी कोल्हापुरे जेव्हा चित्रपटसृष्टीत आल्या त्यावेळी बालकलाकारांची खूप मागणी होती. चित्रपटातील नायक किंवा नायिका यांचे बालपणापासूनची मैत्री दाखवून मग तरुणपणीचा रोमान्स दाखविण्याचा प्रघात होता.

पाच वर्षाची पद्मिनी ’एक खिलाडी बावन पते’ या चित्रपटातून पडद्यावर आली. गुलजार यांच्या किताब या बालचित्रपटात पद्मिनी आणि बहीण शिवांगी कोल्हापुरे यांनी 'अ-आ-इ-ई, मास्टरजी की आ गई चिट्ठी...' हे गाणे म्हटले होते. 'यादों की बारात' या चित्रपटाचे ’टायटल साँग लता मंगेशकर आणि पद्मिनी कोल्हापुरे यांनी गायले होते. पद्मिनीचा आवाज खूप छान होता आणि मंगेशकरांशी नाते असल्याने लता-आशा मंगेशकरांबरोबर कोरस गाण्यासाठी पद्मिनीला संधी मिळाली.

१९८२ साली प्रदर्शित झालेल्या प्रेम रोग ह्या चित्रपटासाठी पद्मिनी कोल्हापुरेला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार‎ मिळाला होता.
'विधाता' चित्रपटात पद्मिनी कोल्हापुरे यांना दिलीप कुमार, संजीव कुमार और शम्मी कपूर या तीन महान कलावंतांबरोबर काम करायला मिळाले.

आहिस्ता-आहिस्ताचे शूटिंग पहायला आलेल्या प्रिंस चार्ल्सचे पद्मिनी कोल्हापुरेने धावत धावत जाऊन चुंबन घेतले आणि तिला जगभर प्रसिद्धी मिळाली.