'बू... सबकी फटेगी' या पहिल्या हॉरर कॉमेडी वेब सीरिजमधून अभिनेत्री मल्लिका शेरावत आणि तुषार कपूर डिजिटल माध्यमात पदार्पण करत आहेत.

ऑल्टबालाजीच्या 'बू... सबकी फटेगी' या पहिल्या हॉरर कॉमेडी वेब सीरिजमधून अभिनेत्री मल्लिका शेरावत आणि तुषार कपूर डिजिटल माध्यमात पदार्पण करत आहेत. या वेबसीरिजमध्ये अश्विनी काळसेकर ह्या मराठी अभिनेत्रीची ची सुद्धा वर्णी लागली आहे अश्विनी एकता कपूर च्या कसम से या मालिकेतील जिज्ञासा वालिया च्या रोल साठी फेमस झाली होती. त्या नंतर या मोठया सिनेमातील महामंगा या भूमिकेतून तिने प्रेक्षकांचे मन जिंकले नंतर ती  वेगवेगळ्या मराठी शो मधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि आता ती बालाजी च्या वेब सिरीज मधून लोकांच्या भेटीला आहे आणि  तिच्या सोबत यात मुकेश तिवारी चा हि समावेश झाला आहे.या वेबसीरिजची कथा काही मित्रांभोवती आधारीत असून ते एका रिकाम्या रिसॉर्टमध्ये जातात. तिथे अशा काही घटना घडतात. ज्यामुळे त्यांचा थरकाप उडतो. या सीरिजमध्ये मल्लिका भूताच्या भूमिकेत दिसणार आहे. तिला या अंदाजात पाहणे कमालीचे ठरणार आहे. गोलमाल सीरिजमध्ये प्रेक्षकांचे धमाल मनोरंजन केलेली ही जोडी आता ऑल्टबालाजीच्या नव्या सीरिजमध्ये भूत बनून नव्याने धमाल करण्यास सज्ज आहेत. यात त्यांच्या जोडीला असतील किकू शारदा, संजय मिश्रा, शेफाली जरीवाला आणि कृष्णा अभिषेक. फरहाद सामजी यांनी या सीरिजचे दिग्दर्शन केले आहे.

अश्विनी म्हणाली, ''ऑल्टबालाजीच्या वेबसीरिजमधून पदार्पण करताना मला आनंद होत आहे.एकता कपूर आणि मी गेल्या कित्येक वर्षांपासून अनेक कार्यक्रमांसाठी एकत्र आलो आहोत. त्यामुळेच, ऑल्टबालाजीसाठी काम करण्यास मी उत्सुक आहे. मला निवडल्याबद्दल फरहाद सरांची मी आभारी आहे.