मुंबई: ज्योत्स्ना फिल्म प्रोडूकशन प्रस्तुत जजमेंट या मराठी सिनेमाचे  मदर्स डे च्या निमित्ताने "तुझ्या सोबतीला" नावाचे गाणे रिलीज करण्यात आले. ह्या गाण्यात, मुलीचा जन्म तिच्या आई साठी किती महत्वाचा असतो आणि आई तिच्या पिल्लांना जीवनाकडे आशावादी नजरेतून पाहण्याची शिकवण देतांना दिसत आहे.

जजमेंट

या सिनेमात  मंगेश देसाई, तेजश्री प्रधान आणि माधव अभ्यंकर यांची झलक पाहायला मिळतेय.   या सिनेमात मंगेश देसाई तेजश्री प्रधानच्या वडिलांच्या भूमिकेत दिसले. जो आपल्या पत्नीची हत्या करतो. 15 वर्षानंतर वकिल होऊन ऋजुता (तेजश्री) आपल्या आईच्या हत्येची केस वडिलांविरोधात पुन्हा सुरु करते. तिला ही तिच्या आईप्रमाणे संपवण्यात येईल अशी धमकी मिळते.

'जजमेंट'च्या माध्यमातून तेजश्री प्रधान आणि मंगेश देसाई पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करत आहेत. तेजश्रीची भूमिकाही  ताकदीची आणि निर्भीड आहे. त्यामुळे या कसलेल्या कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहणे, ही पर्वणीच ठरणार आहे. मंगेश देसाई प्रथमच खलनायकाची भूमिका साकारत असल्यामुळे त्याच्या अभिनयाची आजपर्यंत कधीही न पाहिलेली एक वेगळी बाजू रसिकांना पाहायला मिळणार आहे. तसेच समाजातील काही नकारात्मक बाबीही त्यानिमित्ताने प्रेक्षकांसमोर येतील.