मराठी सिने इंडस्ट्रीत अनेक चित्रपटे आली, त्यामधील  काही अगदी प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करून जाणारी होती. आता  एक असाच नवीन सिनेमा "मोहिनी- मेन इन सारीज "  आपल्या भेटीस येणार आहे, हा चित्रपट पुरुष लावणी कर्त्यांवर आधारित डॉक्युमेंटरी आहे. "मोहिनी-मेन इन सारीस"ची शूटिंग नुकतीच पूर्ण झाली. आणि त्यासहित मोहिनीचा एक पोस्टरही रिलीझ झाला आहे.

ह्या आधीही लावणीवर आधारित नटरंग नावाचा चित्रपट लोकांच्या भेटीस आला होता. व तो प्रेक्षकांच्या पसंतीसही पडला.  मोहिनीचे लेखन, निर्देशक आणि दिग्दर्शन सुप्रसिद्ध अभिनेत्री शर्मिला राजाराम शिंदेंनी केले आहे. शर्मिला ने ह्या आधी पुढचा पाऊल मध्ये "रूपा" नावाचे  निगेटिव्ह रोल केले होते.  सध्या झी ची फेमस सिरीयल माझ्या
नवऱ्याची  बायको मद्धे ही शर्मिला  "जेनी" नावाच्या कॅरेक्टर मद्धे झळकली.

शर्मिला राजाराम शिंदें

                                                      
अनेक चित्रपटांमध्ये, सुपर स्टार्स किंवा सिने सृष्टीतील कलाकारांना घेतले 
 जातात. पण ह्या चित्रपाटाची खास गोष्ट ही आहे की मोहिनी मद्धे एकही अभिनेता नसणार. हा चित्रपट फक्त पुरुष लावणी कलाकारांच्या आयुष्यावर आधारित आहे ज्या मद्धे, ते आपल्या आयुष्यातील घडलेल्या घटनांविषयी  सांगतील.  "मोहिनी-मेन इन सारी"चा पोस्टर बघितल्या नंतर प्रेक्षकांची उत्सुकता वेगाने वाढत आहे.