टाईम पास फेम प्रथमेश परबचा "टकाटक" नावाचा सिनेमा लवकरच आपल्या भेटीस येणार आहे.

टकाटक या सिनेमाची अनेक दिवसांपासून सगळीकडेच  चर्चा चालू होती.  पण नुकतेच ह्या सिनेमाचे पहिले पोस्टर रिलीज झाले आहे.

टकाटक

पर्पल बुल प्रस्तुत टकाटक  ह्या मराठी सिनेमाचे  चे पहिले पोस्टर रिलीज झाले आहे. तसेच ह्या सिनेमाचे दिग्दर्शन मिलिंद झुंबर कावडे यांनी केले असून ओम प्रकाश भट्ट, सुजय शंकरवार, रवी बाहरी,इंद्रजीत सिंग अजय ठाकूर, धनंजय सिंग मासूम आणि रवींद्र चौबे यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.  तसेच ह्या सिनेमात टाईमपास फेम प्रथमेश परब आणि प्रणाली भालेराव हे मुख्य भूमिकेत बघायला मिळतील. तसेच टकाटक ह्या सिनेमाचा ट्रेलर १६ मे ला प्रकाशित करण्यात येणार आहे. परीक्षकांच्याही  मनात टकाटकच्या ट्रेलर आणि सिनेमासाठी एक वेगळीच उत्सुकता लागलेली आहे.