सई च्या चाहत्यांची संख्या काही कमी नाही. ती नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते. आणि तिचे फॅन्स हि तिच्या प्रत्येक पोस्ट ला तिच्या चाहत्यांकडूनही तितकीच दाद मिळत असते. पण ती गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियापासून दूर होती.

अभिनेत्री सई ताम्हणकर ही आज मराठीतील अभिनेंत्री मध्ये सर्वात मोठे नाव आहे. तिने आजवर दुनियादारी, बालक पालक,प्यार वाली लव्ह स्टोरी यांसारख्या अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटात तिने दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. तिचे फॅन फॉलॉव्हिंग प्रचंड आहे. ती नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते. पण ती गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियापासून दूर होती.

सई ताम्हणकर

सईने फेब्रुवारी महिन्यात सोशल मीडियावरून ती डिजीटल डिटॉक्सवर जात असल्याचे जाहीर केले होते. एक महिना डिजीटल डिटॉक्सवर गेलेल्या सईने या दरम्यान पाँडेचरीला जाऊन सचिन कुंडलकरांच्या आगामी सिनेमाचे चित्रीकरण केले. नुकतीच सई पाँडेचरीवरून मुंबईत परत आली असून ती सोशल मीडियवरही परतली आहे. सोशल मीडियवर परतताच सईने एक छान ‘क्लासी बॉस बेब’ फोटोशूट केले.

सईच्या या सोशल मीडिया पोस्टलाही तिच्या चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. या पोस्टनंतर सईचे लागोलाग आलेले बॉस बेब लुकमधले फोटो तर तिच्या चाहत्यांसाठी व्हिजुअल ट्रिट होती असंच म्हणायला हवं. फोटोशूटविषयी सई ताम्हणकर सांगते, “फोटोशूट करणं किंवा शुटिंग करणं हा माझ्या रोजच्या आयुष्याचा भाग आहे. आता डिजीटल डिटॉक्सनंतर मी पुन्हा नव्या जोमाने परतलीय. परतताना, लक्षात येतंय की, सोशल मीडिया हा आपल्या आयुष्याचा महत्वाचा भाग बनला आहे आणि आमच्या सारख्या अभिनेत्यांसाठी आपल्या चाहत्यांसोबत कनेक्ट राहायचं एक माध्यम बनले आहे. हे एक आम्हाला मिळालेले वरदानच आहे. तरीही कधीतरी यातून ब्रेक घेऊन आयुष्यातल्या नव्या अनुभवांना सामोरे जाणे गरजेचे आहे.”

सई ताम्हणकर सोशल मीडियावरून चाहत्यांशी संवाद साधताना म्हणाली, “हो, मी आता पाँडेचरीवरून आणि सोशल मीडिया डिटॉक्सवरूनही एका महिन्यांनी परतलेय. माझ्या सोशल मीडिया डिटॉक्सचा मला शुटिंगसाठी खूप फायदा झाला. पण सोशल मीडियामुळे चाहत्यांशी रोजच्या रोज संपर्कात असण्याची सवय असल्याने मी चाहत्यांना खूप मिस केले. या एका महिन्यात खूप काही घडलंय. मी पाँडेचरीत काय-काय केले ते लवकरच मी चाहत्यांसोबत सोशल मीडियावरून शेअर करेनच.