सिद्धार्थ जाधव एका नॉनफिल्मी बॅग्राऊंड मधून असूनही आज त्याने बॉलीवूड पर्यंतचे शिखर गाठले,  सिद्धूची मराठी ते बॉलीवूड पर्यंतची झेप अगदी अविस्मरणीय आहे.  रंगभूमी वरील नाटक असो किंवा छोट्या पडद्या वरील मालिका असो किंवा अनेक मराठी, हिंदी चित्रपट-ह्या सगळ्याच ठिकाणी सिद्धार्थ चा डंका हळू-हळू  वाजू लागला आहे.

सिद्धार्थ जाधव

सिद्धार्थ ने हिंदी चित्रपटांमद्धे गोलमाल,गोलमाल रिटर्न्स  यासारखे चित्रपटही केले. व त्यासारखे अनेक कॉमेडी शोही त्याने केले. सध्या सिद्धार्थचा डंका बॉलीवूड मध्ये चांगलाच वाजतोय.   रोहित शेट्टीच्या इतर चित्रपटांसहित 'सिम्बा'  मद्धे रणवीर सोबत काम करत तो आता मराठीतच नाही तर बॉलीवूड मधेही आपली जागा निर्माण करू लागला आहे. नुकताच सिद्धार्थचा एक फोटो अगदी वेगाने वायरल झाला आहे, ज्या मद्धे  सिद्धार्थ  जाधव एका शो मध्ये  रणवीर सहित दीपिका पदुकोण, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर सोबत हाथ मिळवत आहे.

रोहित शेट्टी सोबत रणवीर आणि सिद्धार्थ जाधवसिद्धार्थ जाधव


सिंघमच्या शूटिंगच्या दरम्यानही सिद्धू आपले रणवीर आणि रोहित शेट्टी सोबतचे अनेक फोटोस आणि व्हिडियोस टाकत असे. सिद्धार्थच्या अश्याच उंच भरारींसाठी टेल्ली चक्कर मराठी कडून अनंत शुभेच्या.