मराठी कलाकरांनी केलं हवाई दलाचं कौतुक

14 फेब्रुवारी रोजी काश्मीर मध्ये एक भयानक दहशतवादी हल्ला करण्यात आला त्यात 40 केंद्रीय रिझर्व पोलिस दलाचे जवान शाहिद झाले पाकिस्तानस्थित जीएमने या भयानक हल्ल्याची जबाबदारी असल्याचा दावा केला होता. अनेकांनी हल्ल्याचा निषेध केला आणि आमच्या शहीदांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये अशी सगळ्यांची भावना होती.

भारतीय हवाई दलानं मंगळवारी पहाटे पाकिस्तानातील जैश - ए- महम्मदच्या तळावर हल्ले करून ते उद्ध्वस्त केले. पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४१ जवान जैश - ए- महम्मदच्या आत्मघातकी हल्ल्यात शहीद झाले. या हल्ल्यानंतर अवघ्या १२ दिवसांत वायूदलानं कारवाई करत दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त केली. या दमदार कारवाईचे देशवासियांनी जल्लोषात स्वागत केले.

देशवासियांकडून हवाई दलावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.मग त्यात मराठी कलाकारही कसे मागे राहतील मराठी कलाकरांनी देखील ट्विट करत हवाई दलाचं मन भरून कौतुक केलं आहे. अभिनेता सुबोध भावे, सिद्धार्थ चांदेकर, रितेश देखमुख, सोनाली कुलकर्णी, प्रिया बापट सिद्धार्थ जाधव, अमृता खानविलकर यांसारख्या कलाकारांनी हवाई दलाचं कौतुक करत त्यांना सलाम केला आहे.

अभिमान. हा एकच शब्द माझ्या देशासाठी पुरेसा आहे. माझा देश सहनशील आहे, पण शांत बसणारा नाहीये. माझ्या देशात वाद विवाद, भेदभाव होत असेल, पण अतिरेक्यांच्या विरोधात माझा देश एक असतो. तेव्हा कुठलाही धर्म, जात, पंथ आड येत नाही. भारतीय सैन्याला सलाम. जय हिंद. जय भारत असे ट्विट सिद्धार्थ चांदेकर नि केले आहे व आपल्या भावना व्यक्त केल्या

सिद्धार्थ चांदेकर

प्रार्थना बेहरे नि आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून हि एक भावनिक पोस्ट टाकली आहे.

प्रार्थना बेहरे

महाराष्ट्राचा माऊली म्हणजेच रितेश देशमुख यानेही एक छान ट्विट केले आहे.

रितेश देखमुखसोशल मीडियासोनाली कुलकर्णीInsanceSwpnilUmesh

हवाई दलाच्या मिराज विमानांनी अवघ्या दीड मिनिटांत ही कारवाई पार पाडली. यात ३०० हून अधिक दहशतवादी ठार झाल्याचं म्हटलं जात आहे.