मराठी सिनेमासृष्टीतील सुपरस्टार अभिनेता अभिनय बेर्डे सध्या भरपूर चर्चेत आहे. सचिन पिळगाववकर दिग्दर्शित 'अशी हि आशिकी' ह्या चित्रपटात हल्लीच आपल्याला अभिनय बेर्डे आणि हेमल इंगळे मुख्य भूमिकेत काम करताना दिसले होते. 'ती सध्या काय करते' ह्या चित्रपटातून आपले पदार्पण करून तरुण पिढीला आपल्या अभिनयाने आपलंसं करणारा अभिनय बेर्डे आता रवी जाधव दिग्दर्शित 'रंपाट' ह्या चित्रपटात आपल्याला दिसणार आहे. सुप्रसिद्ध हिंदी सिनेमासृष्टीतील अभिनेता मिथुन चक्रवति यांचा बॉलीवूड अंदाज घेऊन अभिनय आपल्या कला-कौशल्याने पुन्हा एकदा सर्वांचेच मन जिकणार आहे. सोशल मीडियावर रंपाट ह्या चित्रपटाचे थैमान उठले आहे. अभिनयाचा बॉलीवूडमधला आगळ वेगळा अंदाज ह्या सिनेमातून आपल्याला बघायला मिळणार आहे.

ABhinay

अभिनय बेर्डे हा सुप्रसिद्ध अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा मुलगा. अभिनयला घरातूनच कलेचा वारसा मिळाला आहे. मराठी रंगभूमी, रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाची छाप उठवलेल्या लक्षिमकांत बेर्डे यांच्याकडून अभिनयने अभिनयाचं बाळकडू घेतले आहे.

Balkadu

चॉकलेट बॉय अभिनय आपल्या लुकने सर्वे रसिकांचे मन जिंकण्यात यशस्वी ठरत आहे, हॅन्डसम हंक अभिनय हल्ली आपल्या सॊशल मिडियावर नेहमीच ऍक्टिव्ह व अपडेटेड असतो. त्याच्या क्युट लुक आणि स्माईलचे सर्वेच फॅन आहेत. 

अभिनयने बॉलीवूड अंदाजात, आपण उभं राहतो जिथून, लाईन सुरु होते तिथून, मुंबईत आलोय हिरो बनायला, आपलं नाव हाय मिथुन! अशी टॅग लाईन देऊन आपले रंपाट लुकचे सोशल मिडियावर फोटो शेअर केले आहेत. 

Abhinay

अभिनयचा बोल्ड अंदाज!

सुपरस्टार अभिनय बेर्डे'चा 'रंपाट' अंदाज! Abhinay BerdeRampat