मराठी चित्रपटसृष्टीमधील उत्कृष्ट अभिनेत्री व नृत्यांगना अमृता खानविलकर चे इंस्टाग्रामवर खूप मोठ्या प्रमाणात फॅन फॉलोवर्स आहेत. अमृता नेहमीच आपल्या फोटो व व्हिडिओज मार्फत आपल्या चाहत्यांसोबत कनेक्टड असते. सोशल मीडिया वर ती खूप ऍक्टिवेट असते.

आताच हाती आलेल्या वृत्तानुसार अमृताचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाले असून तिने याबाबत तिच्या चाहत्यांना अलर्ट मेसेज दिला आहे. यात अमृता लिहिते, "कोणीतरी अज्ञात व्यक्तीने माझा इ मेल हॅक करण्याचा प्रयत्न केला होता पण कसे बरे त्यावर नियंत्रण मिळवता आले आहे. पण त्यासोबत माझे इंस्टाग्राम अकाउंट सुद्धा हॅक झाले असून त्यावर बरेच प्रयत्न करूनही नियंत्रण मिळवता येत नाहीये. माझ्या इंस्टाग्राम अकाउंट वरून कोणत्याही प्रकारचे फोटो अथवा माहिती प्रसारित झाल्यास त्या पोस्ट्स मागे मी नाहीये  हे लक्षात घ्यावे."

अमृता खानविलकर

सादर घटनेबाबत अमृताने पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा नोंदवला असून त्याबाबत चौकशी सुरु आहे. अमृता सध्या सचिन कुंडलकर दिग्दर्शन करत असलेल्या 'पॉंडिचेरी' या चित्रपटात काम करत आहे. ज्याची कथा सचिन कुंडलकर आणि तेजस मोडक यांनी मिळून लिहिली आहे. अद्याप चित्रपटाबद्दल कोणतीही बातमी उघड झालेली नसून यात अमृता सोबत सई आणि वैभव असणार आहेत अशी माहिती आहे.