कलर्स मराठीवरील रिऍलिटी शो 'बिग बॉस'च्या पहिल्या सिझन मध्ये सई लोकूर आपल्याला दिसली होती, आपल्या हटक्या अंदाजाने तिने त्या शो मध्ये प्रसिद्धी मिळवली.

सईने तिच्या कारकिर्दीची सुरुवात हिंदी क्षेत्रातून केली, तिने तिचे पहिले पदार्पण 'कुछ तुम कहो कुछ हम कहे' ह्या हिंदी चित्रपटातून केले होते, ह्या मध्ये तिने बॉलीवूड मधील फर्दिन खानच्या बहिणीची भूमिका साकारली होती. व तसेच किस किसको प्यार करू ह्या हिंदी चित्रपटामध्ये सुप्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा सोबत ती काम करताना दिसली होती.

सई नेहमीच आपल्या सोशल मीडियावर अपडेटेड असते, हल्लीच तिने इंस्टाग्राम वर आपल्या कोळी लुकचे फोटोज शेअर केले आहे. त्यामध्ये तिने अगदीच मराठी लुक अवतरला आहे, मराठमोळ्या अंदाजात ती उठून दिसत आहे. सातारा युवोत्सव मध्ये 'ह्या कोळीवाड्याची शान आई तुझे देऊळ' ह्या गाण्यावर ती नृत्य सादर करणार आहे. असे तिने आपल्या इंस्टाग्राम वर पोस्ट केलेले आहे.

तिने हिरव्या रंगाची चोळी, लाल रंगाची साडी, सोनेरी रंगाची ओढणी, हिरव्या बांगड्या, नाकात सुंदरशी नथ, केसांमध्ये झेंडूच्या फुलांनी मळलेला गजरा, ओठांवर लाल रंगाची लाली, माथ्यावर कुंकू, गळ्यात मंगळसूत्र व सोन्याचा हार... असा अप्रतिम पेहराव तिने केलेला दिसत आहे. तिला साजेल असा हा तिचा अवतार वाटत आहे. व तिच्या चेहऱ्यावर हास्य अगदीच खुलून दिसत आहे. 

येथे पहा तिचे मराठमोळा अंदाजातले फोटोज ...

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sai Lokur (@sai.lokur) on

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sai Lokur (@sai.lokur) on

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sai Lokur (@sai.lokur) on

मग अवडले का तुम्हांला सई लोकूर'चा हा मराठमोळा पेहरावातील कोळी अंदाज....