झी मराठीवरील 'जय मल्हार' या मालिकेतून खंडोबा हि भूमिका साकारणारा देवदत्त नागे एक उत्तम अभिनेता आहे. जय मल्हार आधी देवदत्त देवयानी मध्ये एका भूमिकेत दिसला होता. पण जय मल्हार मालिकेने त्याला विशेष ओळख मिळवून दिली. अभिनयासोबतच देवदत्त त्याच्या वैयक्तिक जीवनात व्यायामाला विशेष महत्त्व देतो. योग्य शारीरिक व्यायाम व सकस आहार हीच निरोगी राहण्याची गुरुकिल्ली आहे असे तो मानतो. अभिनयासोबतच पिळदार शरीरयष्टीसाठी देवदत्त प्रसिद्ध आहे.   

देवदत्त नागे

लहानपणापासूनच देवदत्तला बॅटमॅन, सुपरमॅन सारखे सुपरहिरो फार आवडायचे. आपणही त्यांच्याप्रमाणे शक्तिशाली असावे असे त्याला नेहमी वाटायचे. पुढे जसा मोठा होत गेला तसे त्याला व्यायामाची आवड निर्माण झाली व तो न चुकता जिमला जाऊ लागला.

देवदत्त नागे

आपल्या पिळदारशारीरयष्टीचे श्रेय तो पेणची हनुमान व्यायामशाळा व अलिबागच्या व्यायामशाळेला देतो. आतासुद्धा त्याला वेळ मिळेल तसा तो तिथे जात असतो. व्यायामशाळेला तो मंदिर मानतो. तिथे होणारा प्लेट्सचा आवाज त्याला घंटानादाप्रमाणे भासतो.

देवदत्त नागे

व्यायामशाळेला तो मंदिर मानतो. व्यायाम करताना तो मनाची एकाग्रता कायम ठेवतो. व्यायाम हि आराधना आहे त्यामळे तो त्याचे मन कधीच विचलित होऊ देत नाही. वर्कआउट करताना कोणत्याही प्रकारचे स्टिरॉइड तो घेत नाही.

देवदत्त नागे

देवदत्त ला हॉर्स रायडींग व सायकलिंग ची विशेष आवड आहे. जय मल्हार या मालिकेत शीर्षक गीतामध्ये तो घोड्यावरून जाताना दिसला होता. याशिवाय देवदत्तला मैदानी खेळांमध्ये सुद्धा रुची आहे.

देवदत्त नागे

देवदत्त पूर्णपणे निर्व्यसनी असून निर्व्यसनी असणं हे निरोगी शरीराचे लक्षण आहे असं तो मानतो. त्याला चहाची आवड आहे, पण साखरेचे प्रमाण तो कमी ठेवतो. डाएट त्याच्याकडून पाळला जात नाही पण तो फॉलो करण्यासाठी त्याची नेहमी धडपड असते. त्याचा बराच वेळ तो जिम मध्ये घालवतो.