लागीर झालं जी'ची नवीन जयडी रिअलमध्ये आहे ग्लॅमरस, पहा तिच्या घायाळ करणाऱ्या अदा सोशल मीडियावर जयडीच्या फोटोंवर नजर टाकली तर तिचे विविध अदा असलेले फोटो तुम्हांला पाहायला मिळतील.

पूर्वा शिंदे

झी मराठीवरील 'लागिर झालं जी' मालिका दिवसेंदिवस अधिकाधिक रंजक बनत चालली आहे. मालिकेतील अजिंक्य आणि शीतल ही जोडी रसिकांना चांगलीच भावते आहे. मात्र याशिवाय मालिकेतील इतर कलाकारसुद्धा तितकेच लोकप्रिय झाले आहेत. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा वेगळी असून त्या त्या व्यक्तीरेखेचं विशेष महत्त्व आहे. यांत अजिंक्यचा मित्र राहुल्या, विक्या, त्याचे मामा-मामी, जिजी, जयडी रसिकांमध्ये लोकप्रिय ठरले आहेत.

पूर्वा शिंदेपूर्वा शिंदेपूर्वा शिंदे

लागीर झालं जी'ची नवीन जयडी साकारणारी पूर्वा शिंदे ही चाहत्यांमध्ये चांगलीच फेव्हरेट ठरत आहे. मराठीतील आयब्रो गर्ल असेही तिला ओळखले जाते. सोशल मीडियावर जयडीच्या फोटोंवर नजर टाकली तर तिचे विविध अदा असलेले फोटो तुम्हाला पाहायला मिळती. मालिकेत बहुतांशी साडीमध्ये आणि पंजाबी ड्रेसमध्ये वावरणारी जयडी ही प्रत्यक्षात रिअल लाइफमध्येही स्टायलिश असल्याचं या फोटोवरुन पाहायला मिळत आहे.

पूर्वा शिंदे

प्रियाला वेस्टर्न कपडे घालायला खूप आवडतात. तिच्या इन्स्टाग्रामवरील फोटोजमधून तिला वेस्टर्न लूकची आवड असल्याचे दिसते. पूर्वा शिंदे जयडी भूमिकेमुळे रसिकांना भावली आहे. त्यातच तिचा हा रिअल लाइफ स्टायलिश अंदाज पाहून तिच्या चाहत्यांच्या संख्यतेही वाढ होत आहे. तिचे इन्स्टाग्रामवर 37.1k हून अधिक फॉलोअर्स आहेत.

पूर्वा शिंदे

मालिकेत जयडी ही भूमिका पूर्वाच्या आधी अभिनेत्री किरण ढाणे हिने साकारली होती. मात्र मानधन वाढवून न दिल्याने तिने ही मालिका सोडली होती. लागिरं झालं जी मालिके नंतर किरण आता डॅशिंग पोलिसाच्या भूमिकेत झळकत आहे. 'एक होती राजकन्या' मालिकेतून रसिकांच्या भेटीला आली आहे.