भालचंद्र कदम नावाचं वादळ सध्या मराठी कॉमेडी च्या जगतात खूपच गाजतंय पण भालचंद्र पासून ते सर्वांच्या लाडका  भाऊ कदम पर्यंत चा प्रवास काही सोपा नव्हता हा खडतर प्रवास नक्की होता तरी कसा हे पाहूया.

भाऊ कदम

भालचंद्र पांडुरंग कदम याचा जन्म: १२ जून १९७२ ला झाला भाऊ कदम याचे बालपण मुंबईतील वडाळा परिसरातील बीपीटी क्वॉटर्समध्ये गेले आहे. वडाळा येथील ज्ञानेश्वर विद्यालयातून त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. बालपणापासूनच ते लाजाळू आणि शांत स्वभावाचे होते. वडिलांच्या अकाली निधनानंतर वडाळ्याहून ते आपल्या कुटुंबासोबत डोंबिवलीत स्थायिक झाले. भाऊ, घर खर्चासाठी मतदार नावे नोंदणीचे काम करत होते, पण त्यात भागत नसल्याने त्यांनी भावाच्या साथीने पानाची टपरी सुरू केली. पण त्यांच्यातला अभिनयाचा किडा तसाच होता. १९९१ मध्ये त्यांनी नाटकात काम केले व येथून त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरूवात झाली.

भाऊ कदम

पंधरा वर्षांत भाऊ यांनी जवळजवळ ५०० नाटकांमध्ये अभिनय केला. खरं तर करिअरमध्ये मोठी संधी मिळत नसल्याचे पाहून त्यांनी अभिनयाला रामराम ठोकण्याचाही विचार केला होता. मात्र त्याचकाळात विजय निकम यांनी त्यांना 'जाऊ तिथे खाऊ' या नाटकात मुख्य भूमिका दिली. हे नाटक त्यांच्या करिअरमधील टर्निंग पॉईंट ठरलेभाऊ नाटकांमध्ये काम करत असल्याने त्यांच्याबद्दल इंडस्ट्रीतील बऱ्याच लोकांना माहित होते. त्यांच्यापैकी काहींनी त्यांचे नाव 'फू बाई फू'साठी सुचवले. मात्र सलग दोनदा भाऊंनी 'फू बाई फू'ची ऑफर नाकारली. लाजाळू स्वभावाच्या भाऊंना मला हे काम जमणार नाही, असे वाटायचे. मात्र तिसऱ्यांदा आलेली ऑफर त्यांनी स्वीकारली आणि संधीचे सोने केले. 'फू बाई फू'च्या सहाव्या पर्वाचे ते विजेतेसुद्धा ठरले. व तिथून खऱ्या अर्थाने भाऊ कदम या वादळाची सुरुवात झाली.

भाऊ कदम

त्या नंतर त्यांच्या आयुष्यात आली चला हवा येउद्या हि मालिका या मालिकेने त्यांचे  पूर्ण आयुष्यच बदलले निलेश साबळे यांच्याबरोबर त्यांनी मुख्य भूमिका देखील बजावाल्या आहे. या मालिकेत त्यांनी  केलेली प्रत्येक भूमिका मग ती पप्पू,असो वा ज्योतिषी किंवा अनेक विविध भूमिका असोत त्यांची  प्रत्येक भूमिका तितकीच गाजली  अभिनयातील जवळजवळ प्रत्येक भूमिकेत भाऊ आपल्या अचूक टायमिंगसाठी अद्वितीय आहेत. या कार्यक्रमाने ३०० यशस्वी एपिसोड पूर्ण केले आहेत आणि जवळजवळ प्रत्येक एपिसोडमध्ये कदम या कल्पित विनोदवीराने अभिनय केला आहे. अनुवांशिक विनोद करताना त्यांच्या निरागसतेने लाखो मराठी चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवली.

भाऊ कदम

त्याच बरोबर भालचंद्र कदमांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यात टाईमपास २, टाईमपास, सांगतो ऐका, मिस मॅच, पुणे विरूद्ध बिहार, नारबाची वाडी, कोकणस्थ, चांदी, मस्त चाललंय आमचं, बाळकडू असे काही यशस्वी चित्रपटही आहेत ज्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे. त्यांनी एका हिंदी चित्रपट "फरारी की सवारी" मध्ये देखील अभिनय केला आहे..आणि नुकताच आलेला त्यांचा चित्रपट नशीबवान यात तर त्यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.

भाऊ कदमांचा हा यशस्वी प्रवास असाच सुरु राहो आणि पूर्ण महाराष्ट्रला ते असेच हसवत राहोत.

आणि वाढदिवसाच्या हि भाऊ कदम याना आभाळभर शुभेच्छा.