छोट्या पडद्यावरील अभिनेता हरिश दुधाडेने मालिकेत विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. नुकतेच त्याच्या घरी एका नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. कोण आहे हा पाहुणा हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल ना.... हा पाहुणा म्हणजे कोणी व्यक्ती नाही तर त्याने नवीन गाडी घेतली आहे. फोर्ड इकोस्पोर्ट कार हरिशने विकत घेतली आणि ही बातमी त्याने सोशल मीडियावर दिली आहे.

हारिश् दूधाड़े च्या घरी नवा पहुणा

हरिश दुधाडेच्या घरात नवीन सदस्य आला असल्यामुळे तो खूप खूश आहे. त्याचा हा नवा मेंबर म्हणजे फोर्ड इकोस्पोर्ट कार. त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून म्हटले की, हर हर महादेव...एक नवा मावळा लढण्यासाठी सज्ज. माझ्या कुटुंबात नवीन सदस्य दाखल झाला फोर्ड इकोस्पोर्ट. नवीन कार

हारिश् दूधाड़े च्या घरी नवा पहुणा

माझे मन तुझे झाले' या मालिकेतून हरिश दुधाडे घराघरात पोहचला. त्यानंतर सरस्वती मालिकेत रणजीतची भूमिका साकारून हरिश दुधाडेने रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. सध्या तो नकळत सारे घडले या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे.