मराठी अभिनेत्री आणि मॉडेल्स या एकाच नाण्याच्या दोन बाजू समजल्या जातात. मराठी सिनेसृष्टीत नायिका म्हणजे चापूनचोपून नेसलेली साडी आणि डोक्यावर पदर असा समज होता. तोच समज आता गैरसमजात बदलतोय असं वाटतंय कारण, बदलत्या काळानुसार मराठी नायिकांचे स्वरूप बदलत चालले आहे.  

जसजशी मराठी इंडस्ट्री एक पाऊल पुढे टाकत नावारूपाला येतेय त्याचप्रमाणे मराठी नायिकांनी सुद्धा अगदी चार पावले पुढे जात केवळ अभिनयातच नव्हे तर दिसण्याबद्दल सुद्धा बोल्ड लुक स्वीकारला आहे. विशेष म्हणजे प्रेक्षकांनी सुद्धा या अभिनेत्रींना त्यांच्या या बोल्ड लुक मध्ये स्वीकारले आहे. 

अशाच काही बिकिनी लुक मधील काही बोल्ड अभिनेत्रींचा घेतलेला एक आढावा.

 

 

सई ताम्हणकर 
सई ताम्हणकर 

 

सई ने 'नो एन्ट्री' या हिंदी सिनेमासाठी बिकिनी घातली आणि अनेकांच्या भुवया आश्चर्याने उंचावल्या. मराठी अभिनेत्रीचा असा अंदाज यापूर्वी पाहिला गेला नव्हता हे यामागचे कारण असू शकेल. पण सई ने या चौकटीबाहेर जाऊन विचार केला आणि मराठी नायिकांचे स्वरूपच बदलले. तिच्या या कामाचे बरेच कौतुक झाले. बिकिनी लुक आणि तिचा उत्तम अभिनय यामुळे सईचा केवळ मराठीतच नाही तर हिंदी सिनेसृष्टीतसुद्धा मोठा फॅन क्लब तयार झाला आहे.

 

 

नेहा पेंडसे
नेहा पेंडसे

 

नेहा पेंडसे दिसायला खूपच सुंदर आहे. तिने मराठी सोबतच बऱ्याच दाक्षिणात्य चित्रपटांमधून देखील काम केले आहे. साडीवर नेहा नेहमीच बोल्ड दिसत आलीय. पण नुकत्याच झालेल्या बिग बॉस या मराठी सीजन दरम्यान तिचा बिकिनी लुक पाहायला मिळाला. या लुक मध्ये सुद्धा तिचे सौंदर्य खुलून दिसत आहे.

 

 

शिबानी दांडेकर
शिबानी दांडेकर 

 

शिबानी सध्या बॉलीवूड अभिनेता व दिग्दर्शक फरहान अख्तर सोबत रिलेशनशिप मध्ये आहे. ही मॉडेल तथा अभिनेत्री तिच्या सोशल मीडिया वरील बिकिनी लूक्स मुळे अधिक चर्चेत आहे.

 

 

स्मिता गौंडकर 
स्मिता गौंडकर 

 

मराठी मॉडेल्स जगतातील अजून एक नाव स्मिता गौंडकर. स्मिताचा बोल्ड लुक बिग बॉस या मराठी सीजन दरम्यान सुद्धा पाहायला मिळाला. 'पप्पी दे पारूला' या गाण्यामुळे ती अधिक चर्चेत आली. ती छान नृत्यांगना आहे तसेच दिसायलाही सुंदर आहे. तिचा हा बिकिनी लुक तिच्या 'पप्पी दे पारूला' गाण्यात सुद्धा पाहायला मिळाला होता. बिग बॉस या मराठी सीजन मध्ये सुद्धा ती खूप चर्चेत होती.

 

 

नेहा जोशी
नेहा जोशी

 

'झेंडा' , 'पोश्टर बॉईज' या सारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची वेगळीच छाप टाकणाऱ्या नेहा जोशीने तिचे बिकिनी लूक्स चे फोटो सोशल मीडिया वर शेअर केले आहेत. तिने हे बिकिनी फोटो शूट करून या बोल्ड लुक मध्ये आपण ही मागे नाही आहोत हे दाखविले आहे. तिच्या या ब्लॅक बिकिनी मध्ये ती खूपच आकर्षक दिसत आहे.

 

 

मानसी नाईक 
मानसी नाईक 

 

'वाट बघतोय रिक्षावाला' फेम मानसी नाईक सुद्धा या बिकिनी रेस मध्ये मागे नाही. मानसीने सुद्धा तिचे काही बिकिनी फोटो सोशल मीडिया वर शेअर केले होते. मानसी एक छान नृत्यांगना आहे. तिने अनेक चित्रपट आणि मालिकांमध्येही अभिनय केला आहे. तिच्या या बिकिनी मधील बोल्ड लुक ला प्रेक्षकांनीही पसंती दाखवली आहे. ती तिच्या या बिकिनी लुक मध्ये खूप बोल्ड दिसत आहे.