मराठी सिनेसृष्टीतील एक नवा व फ्रेश चेहरा म्हणून ‘प्रार्थना बेहरे’ ला ओळखले जाते. उत्तम अभिनयक्षमता व सुंदरता यासाठी तिला ओळखले जाते. अलीकडच्या काळात प्रार्थना चे अनेक चित्रपट रिलीज झाले तर काही रिलीजच्या मार्गावर आहेत. तिच्या लूक्स सोबतच तिने आजवर साकारलेल्या भूमिकासुद्धा तितक्याच नावाजल्या गेल्या. मराठीतील बोल्ड अभिनेत्रींनपैकी प्रार्थना एक आहे. आपले काम परफेक्ट करणे याकडे तिचा जास्त कल असतो. अशा या ‘परफेक्ट गर्ल’ च्या काही लूक्स वर नजर टाकूया.

प्रार्थना बेहरे

प्रार्थना च्या या लुक मध्ये ती अतिशय कमी मेकअप मध्ये दिसत आहे. लाईट पिंक वेअर मध्ये त्याच शेड मधील केसातील फुल यामुळे तिच्या लूक्स मध्ये भर पडली आहे. अगदी काहीच ज्वेलरी न वापरता सुद्धा ती खूप सुंदर दिसत आहे.

प्रार्थना बेहरे

प्रार्थना ला कोणताही रंग खुलून दिसतो. तिच्या या लुक मध्येसुद्धा ती खूप सुंदर दिसत आहे. पिवळा रंग तिच्यावर खुलून दिसत आहे. हवेत हळुवार उडणारे तिचे केस तिच्या सुंदरतेत आणखीनच भर टाकत आहेत. या लुक मध्ये सुद्धा तिने अगदी कमी ज्वेलरी वापरली आहे. तिचा लिपस्टिकचा लाईट शेड सुद्धा तिच्यावर छान दिसतो.

प्रार्थना बेहरे

तिच्या या लुक मध्ये तिने जरा हेवी ज्वेलरी वापरली आहे. प्रार्थने चे मधाळ डोळे हा तिच्या सुंदरतेचा आणखी एक प्लस पॉईंट आहे. तिची नजर भेदक वाटते. या लुक मध्ये तिने कपाळावर लावलेली बारीक टिकली तिला फार शोभून दिसत आहे. तिच्या काळ्याभोर केसांना हलकीशी ब्राउनिश शेड आहे.

प्रार्थना बेहरे

प्रार्थना तिच्या या लुक मध्ये खूप कॉन्फिडन्ट वाटत आहे. खुल्या केसांमध्ये ती खूप आकर्षक दिसतेय. केस खुले असो व बांधलेले ती कोणत्याही हेअर स्टाईल मध्ये छान दिसते. केसांचे ब्लॅक अँड ब्राऊन कॉम्बिनेशन तिच्यावर छान दिसत आहे. प्रार्थना नेहमी कमी ज्वेलरी वापरण्यावर भर देते. सुंदर दिसण्यासाठी ज्वेलरीने स्वतःला सजवण्यापेक्षा आपण आहोत तसे प्रेसेंट व्हावे, यावर तिचा विश्वास आहे.

प्रार्थना बेहरे


वेस्टर्न लुक प्रमाणे प्रार्थना तिच्या पारंपरिक लुक वर सुद्धा सुंदर दिसते. तिच्या या साडीमधल्या लूकमध्ये ती खूपच आकर्षक दिसत आहे. तिचे काळेभोर केस नेहमीच सुंदर दिसतात. चेहऱ्यावर केसांची बट आल्याने तिचा लुक सुंदर वाटत आहे. बारीक टिकली तिच्या सुंदरतेचा नेहमीच भर घालते.