ती नेहमी हसतमुख असते ही जणू तिची ओळखच आहे. अशी ही ‘मुक्ता बर्वे’ मूळची पुण्याची असून, तिला 'पुणेकर' असण्याचा अभिमान आहे. लहानपणापासूनच ती अंतर्मुख आहे. तिने तिचे अभिनय प्रशिक्षण पुणे विद्यापीठ तसेच ललित कला केंद्र पुणे येथून पूर्ण केले. 'जोगवा' व 'मुंबई पुणे मुंबई' हे तिचे सर्वाधिक गाजलेले मराठी चित्रपट आहेत.

मुक्ताला वेगवेगळे पोशाख परिधान करायला आवडतात. अशाच काही तिच्या वेगवेगळ्या लूक्स वर नजर टाकूया.

 

 

मराठमोळी मुक्ता 
मराठमोळी मुक्ता

 

हा मुक्ताचा ट्रेडिशनल लुक, डोक्याला फेटा, नाकाला नथ, आणि कपाळावर चंद्रकोर यामध्ये ती खूपच शोभून दिसत आहे. साधेपणात सौंदर्य असे या फोटोचे वर्णन करावे लागेल. पुणेकर असल्याने मुक्तावर लहानपणापासूनच मराठी संस्कृतीचे योग्य संस्कार झाले यात शंकाच नाही.

 

 

स्टायलिश अंदाज 
स्टायलिश अंदाज 

 

या ग्रे शेड लुक मध्ये मुक्ता अतिशय छान दिसत आहे. तिच्या गव्हाळ वर्णावर ग्रे - शेड अधिक खुलून दिसत आहे. या ड्रेस वर बरेच नक्षीकाम असल्याने मुक्ताने या लुक वर ज्वेलरी नसण्यालाच प्राधान्य दिले आहे. मुळातच, ती दिसायला सुंदर असल्याने तिची सुंदरता हाच तिचा दागिना आहे.

 

 

मुक्ता आणि साडी 
मुक्ता आणि साडी 

 

मुक्ता आणि साडी हे समीकरणच वेगळं आहे. लहानपणापासूनच मुक्ताला साडी विषयी आकर्षण आहे. तिच्या या लुक मध्ये मुक्ता 'परफेक्ट वूमन फॉर साडी' अशीच वाटत आहे. ब्लॅक अँड व्हाईट या कॉम्बिनेशन वर तिच्यातील निरागसता अतिशय बारकाईने उठून दिसत आहे. मुक्ता नेहमीच कमी ज्वेलरी असण्याला महत्त्व देते.

 

 

मुक्ताचा प्रिंटेड ब्राईट लुक 
मुक्ताचा प्रिंटेड ब्राईट लुक 

 

ब्लॅक अँड व्हाईट प्रमाणे उठावदार रंग सुद्धा मुक्तावर तितकाच शोभून दिसतो. या लुक मध्ये मुक्ता प्रिंटेड ड्रेस मध्ये दिसत आहे. तसं पाहायला गेलं तर मुक्ताला प्रत्येक रंग शोभून दिसतो. साधेपणा प्रमाणेच ट्रेंडी राहण्याला सुद्धा ती महत्त्व देते, तसंच ती अगदी कोणत्याही आउट फिट मध्ये सुद्धा शोभून दिसते.

 

 

स्टायलिश मुक्ता
स्टायलिश मुक्ता

 

पारंपारिक राहण्याबरोबरच मुक्ता स्टायलिश राहण्याला सुद्धा महत्त्व देते. तिच्या या लुक मध्ये ती व्हाईट आणि ब्लू कॉम्बिनेशन मध्ये दिसत आहे. स्माईल आणि मुक्ता हे वेगळंच पॅकेज आहे. 'हसताना ती खूप छान दिसते' आणि 'ती खूप छान हसते' असंच काही म्हणावं लागेल. मुक्ताची स्माईल आणि तिचा स्माईली लुक टी शर्ट हा योग छान जुळून आलाय.