सई ताम्हणकर

सई ताम्हणकर


 सई ताम्हणकर या मराठी-हिंदी चित्रपट सृष्ंटीतील एक नावाजलेल्या अभिनेत्री आहेत. बिनधास्त अभिनेत्री म्हणून सई  मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टींत ओळखल्या जातात. त्या मूळच्या सांगली या गावच्या आहेत. प्रामुख्याने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत असलेल्या सईने आजवर अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. २०१३ साली "दुनियादारी" या चित्रपटाच्या यशाने सई यांना मराठी चित्रपटसृष्टीत नवी ओळख मिळवून दिली. या सोबत सई ने मराठी व हिंदी अशा  दोन्ही भाषांमध्ये चित्रपट केले आहे.

स्वप्नील जोशी

स्वप्नील जोशी

स्वप्नील, मराठी सिनेमा सिनेमातला  चॉकलेटे बॉय म्हणून ओळखला जातो. स्वप्नीलला लहानपणापासूनच अकटिंगची खूप आवड होती असे स्वप्नील नेहमीच सांगतांना दिसतों. स्वप्नील ने १९९३ मध्ये कुमारवयातील श्री कृष्णाचा अभिनव केला होता. स्वप्नील ने २०१८ साली चेकमेट मधून मुख्य भूमिकेत दिसून आला होता.  स्वप्नीलने दुनियादारी, तुहिरे, मितवा इत्यादी सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
   
प्रिया बापट

प्रिया बापट

प्रिया प्रामुख्याने मराठी चित्रपटांत, नाटकांत आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम करते. २००० साली प्रियाने  डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्या चित्रपटामध्ये भूमिका करून आपल्या  अभिनयाची सुरुवात केली.  मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई इत्यादी बॉलिवूड चित्रपटांमध्येही  छोट्या भूमिका करणारी प्रिया नवा 'गडी.. नवं राज्य' ह्या मराठी नाटकामध्ये आघाडीच्या भूमिकेत झळकली . प्रियाने आजवर अनेक चित्रपटांमध्ये कामे केले  आहे. २००८ च्या डिसेंबरमध्ये प्रियाने  नाटक रंभूमीवर निर्माती म्हणून एक नवे पाऊल टाकले. 'दादा एक गुड न्यूज आहे ' हे नाटक तिने प्रक्षकांसमोर आणले.

सिद्धार्थ जाधव

सिद्धार्थ जाधव

सिद्धार्थला लहान पण पासूनच चित्रपट मध्ये काम करण्याची आवड होती, सिद्धार्थ सांगतो की लोक सिद्धार्थ च्या दातांवरून नेहमी त्याची मस्करी करत असत ज्याचे तेनी कधीही वाईट ना मानता आपले  ऍक्टिंग करियर साथीचे प्रयत्न चालूच ठेवले.  त्याने मराठी आणि हिंदी चित्रपटांबरोबरच अनेक दूरदर्शन मालिका आणि नाटकांतही  काम केले आहे. ह्या सर्व क्षेत्रातून तो सर्वांच्या आवडीचा बनला आहे. महाविद्यालयामध्ये असतान,  त्याने अनेक एकांकिकांमध्ये काम केले. तो पहिल्यांदा देवेंद्र पेम यांच्या 'तुमचा मुलगा करतो काय' या नाटकामधून प्रकाशझोतात आला. व तसेच सिद्धार्थ ने रोहित शेट्टीच्या 'गोलमाल' व नुकतेच 'सिम्बा ' सारख्या चित्रपटातही काम केले आहे.

स्पृहा जोशी

स्पृहा जोशी


 प्रामुख्याने मराठी मालिकांमध्ये काम करणारी  स्पृहा जोशी ही झी मराठी वाहिनीवरील 'उंच माझा झोका, एका लग्नाची दुसरी गोष्ट व एका लग्नाची तिसरी गोष्ट इत्यादी. मालिकांमध्ये झळकली. तसेच ‘उंच माझा झोका’ मध्ये रमाबाई रानडेची भूमिकाही  स्पृहाने साकारली स्पृहा कवियत्रीही  आहे. ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’मध्ये स्पृहा कुहू नावाच्या एक स्वप्नाळू कवयित्री आहेत.

तसेच ती दूरचित्रवाणीवर अँकरिंगही करते .  'किचनची सुपरस्टार' या कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही स्पृहाने केले होते.

मुक्ता बर्वे

मुक्ता बर्वे

भ्यासू, स्वतंत्र विचारांची आणि मेहनती अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वे मराठी नाट्य आणि चित्रपट सृष्टींत ओळखली जाते.  मुक्ताची रंगभूमीवरील  सुरुवात बालपणापासून झाली होती. मुक्ताने चार वर्षाची असताना आईच्या ‘रुसू नका फुगू नका’ या नाटकात काम केले आणि त्यानंतर १५ व्या वर्षी नाट्यस्पर्धेच्या निमित्ताने रत्‍नाकर मतकरींच्या ‘घर तिघांचे हवे’ या नाटकात भूमिका केली. मुक्ता  प्रामुख्याने मराठी भाषिक चित्रपट, नाटके आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये कामे करतांना दिसते.  २००० साली व्यावसायिक कारकिर्दीस सुरुवात केलेल्या मुक्ताने काही हिंदी चित्रपटांतूनही अभिनय केला आहे.

मुक्ताचे जोगवा ह्या २००९ सालच्या मराठी चित्रपटामधील भूमिकेसाठी खूप  कौतुक झाले व तिला ह्यासाठी काही पुरस्कार देखील मिळाले. २०१२ मध्ये झी मराठी प्रदर्शित झालेल्या एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेत राधा देसाई ही मध्यवर्ती भूमिका मुक्ताने  केली होती.