आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने रसिकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री पूजा सावंत सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह आहे.

पूजा सावंत

आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने रसिकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री पूजा सावंत सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह आहे.

पूजा सावंत

 सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासह शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी पूजाने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत पूजा ट्रेडिशनल अंदाजात दिसतेय. ऑफ व्हाईट रंगाच्या ड्रेसमध्ये पूजा खुपच सुंदर दिसतेय. या फोटोला पूजाने एक कॅप्शन सुद्धा दिले आहे. सर्व काही जुळून आले. पूजाच्या या फोटोवर तिच्या फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

पूजा सावंत

काही दिवसांपूर्वीच पूजाने बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केले आहे. 'जंगली' सिनेमात तिने शंकराची भूमिका बजावली असून ती महिला माहूत आहे. तिच्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. इतकेच नाही तर तिच्या भूमिकेचे देखील सर्वत्र कौतूक झाले होते.