रिंकूने काही दिवसांपूर्वी शेअर केलेल्या एका फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. या फोटोत तिने साडी नेसली असून छानसा गजरा देखील केसात माळला आहे.

रिंकू

सैराट या पहिल्याच चित्रपटामुळे रिंकू राजगुरू स्टार बनली. तिला केवळ महाराष्ट्रातच नाही तर जगभर लोकप्रियता मिळाली. सैराट या चित्रपटासाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने देखील गौरवण्यात आले होते. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे कौतुक बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी देखील केले होते. रिंकूला एकाच चित्रपटामुळे प्रचंड स्टारडम मिळाले. तिच्या फॅन्सची संख्या प्रचंड आहे.

रिंकू

रिंकूचे अनेक फॅन्स असून ते सोशल मीडियावर देखील तिला फॉलो करतात. रिंकूचा सैराट हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता चार वर्षांहून देखील अधिक काळ झाला आहे. रिंकूने सोशल मीडियावर आपले अकाऊंट सुरू करावे ही तिच्या चाहत्यांची चार वर्षांपासूनची इच्छा आहे. पण रिंकूने सोशल मीडियापासून दूर राहाणेच पसंत केले होते. मात्र गेल्यावर्षी तिने तिचे इन्स्टाग्रामवर अकाऊंट सुरू केले. तिच्या या अकाऊंटला अल्पावधीतच खूप चांगले फॉलोव्हर्स मिळाले आहेत. सध्या ३३ हजाराहून अधिक तिचे फॉलोव्हर्स असून तिने इन्स्टाग्रामवर आतापर्यंत केवळ ५४ पोस्ट टाकल्या आहेत. रिंकू तिच्या इन्स्टाग्रामवर खूपच कमी अॅक्टिव्ह असते हे यावरून दिसून येत आहे. तिचे विविध अंदाजातील आणि तिच्या चित्रपटाच्या संबंधीत असलेले फोटो ती यावर पोस्ट करत असते. तिच्या सगळ्याच फोटोंना तिच्या फॅन्सचा भरभरून प्रतिसाद मिळतो.

रिंकू

रिंकूने काही दिवसांपूर्वी शेअर केलेल्या एका फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. या फोटोत तिने साडी नेसली असून छानसा गजरा देखील केसात माळला आहे. साडीला साजेशे असे तिने ट्रेडिशनल दागिने घातले असून चंद्रकोरची टिकली लावली आहे. ती या रूपात खूपच छान दिसत असल्याचे तिच्या फॅन्सचे म्हणणे आहे.

रिंकूgfgf