चला हवा येऊ  द्या सारख्या शो मधून आपल्या भन्नाट विनोदांनी सगळ्यांना खळखळून हसवणाऱ्या  भाऊ कदमने सोशल मीडियावर शेअर केला आमिर खानसोबतचा खास फोटो.

डोक्यावर टोपी, सदरा लेंगा घातलेला  भाऊ, आमिरचा आणि आमिरची बायको किरणही ह्या फोटोत आहे.भाऊ सहित किरण व अमीरहि एका मराठमोळ्या अवतारात दिसून आले. तसेच किरणनेही,  पैठणी परिधान केली आहे.

‘चला हवा येऊ द्या’ या कॉमेडी शोमधून सगळ्यांना पोटभरून  हसवून आपली धुक्ख्या विसरावून लावणारा म्हणजेच सगळ्यांचा लाडका भालचंद्र कदम (उर्फ भाऊ).  

आपला लाडका विनोदवीर सोशल मीडियावरही सक्रीय असतो. या माध्यमातून तो फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करतो. नुकताच त्याने शेअर केलेला एक फोटो फॅन्सच्या पसंतीस येतोय. भाऊने हिंदी चित्रपटसृष्टीचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खानसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत भाऊ आमिर आणि त्याची पत्नी किरण रावसोबत आहे.  लक्षणीय बाब म्हणजे यात भाऊसह आमिर आणि किरण रावही मराठमोळ्या अवतारात पाहायला मिळत आहेत. डोक्यावर टोपी, सदरा लेंगा असा भाऊ आणि आमिरचा लूक या फोटोत आहे. तर किरण रावनंही मराठमोळ्या अंदाजात पैठणी परिधान केली आहे. नाकात नथ, डोक्यावर पदर असा किरण राव लूक पाहायला मिळत आहे. भाऊच्या या फोटोवर सोशल मीडियावर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव सुरू आहे.