कलर्स मराठीवरील 'एकदम कडक' स्पेशल एपिसोड मध्ये 'बिग बॉस' मराठी पहिल्या पर्वातील कलाकारांनी धुमाकूळ घालताना दिसला आहे. 'बिग बॉसच्या पहिल्या पर्वातले स्पर्धक पुन्हा एकमेकांसमोर आले आहेत आणि पुन्हा सुरू झाले आहेत वाद, तीच आरडा-ओरडी, आरोप-प्रत्यारोप आणि बरंच काही. 'एकदम कडक' या शोचे जितेंद्र जोशींनी सूत्रसंचलन केलेले आहे. त्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे कलाकारांनी दिले आहे. 'बिग बॉस' रिऍलिटी शो मराठी फक्त सोशलवरच नाही तर, महाराष्ट्रातल्या घरोघरी चर्चेचा विषय बनला आहे. 

भूषण कडू, जुई गडकरी, मेघा धाडे, पुष्कर  जोग, राजेश  श्रीनगरपुरे, रेशम  टिपणीस, ऋतुजा  धर्माधिकारी, सई लोकूर, स्मिता गोंदकर, सुशांत शेलार, उषा नाडकर्णी, विनीत भोंडे, शर्मिष्ठा राऊत, नंदकिशोर चौघुले, आरती  सोळंकी, आस्ताद  काळे, त्यागराज  खाडिलकर, अनिल थत्ते हे सर्व कलाकार पुन्हा एकदा  एकत्र येऊन या शो संगीत आणि नृत्यांचा जल्लोषाने चाँद चाँद लावले आहे.व हा भाग पूर्ण आठवडा चालणार आहे.

स्मिता गोंदकरने आणि सुशांत शेलार आपल्या परफॉर्मन्सने सर्वांना भारावून टाकले आहे. 

'एकदम कडक' या शोमध्ये आरती सोळंकीने 'बिग बॉस' घरातील वाईट अनुभव हि ह्याशोमार्फत तिने शेअर केले आहे व त्यावर मेघा धाडेने दिले उत्तर.....

मराठी 'बिग बॉस' पहिल्या पर्वातील रहिवास्यांनी घातलेली धुडगूस पाहायला विसरू नका....!