VIVO IPL चे सामने मराठीतून पाहा फक्त ‘स्टार प्रवाह’वर.

सध्या देशात सर्वाधिक उत्सुकता आहे ती VIVO IPL २०१९ ची. क्रिकेटच्या मराठमोळ्या चाहत्यांसाठी स्टार प्रवाहकडून एक खुशखबर आहे. VIVO IPLचे सामने प्रेक्षकांना ‘स्टार प्रवाह’वर पाहता येणार आहेत आणी  तेही मराठीतून. २३ मार्चचा पहिला सामना आणि दर रविवारी VIVO IPLचे रंगतदार सामने प्रेक्षकांना मराठीतून.  ‘ विशेष म्हणजे VIVO IPL सामन्यांच्या आधी ‘क्रिकेट नाका’ या अनोख्या कार्यक्रमातून क्रिकेट सामन्यांचा उहापोह केला जाणार आहे. अतुल परचुरे, पुष्कर श्रोत्री, विजय केंकरे, विजय पटवर्धन आणि खुशबू तावडे ही कलाकार मंडळी आपल्या खुमासदार शैलीने सामन्यांविषयीची उत्सुकता वाढवतील.

IPL 2019

मराठी भाषा आणि क्रिकेट या दोन्हीची प्रत्येक मराठी माणसाच्या मनात जागा आहे. आता VIVO IPL २०१९च्या निमित्ताने मराठी प्रेक्षकांना क्रिकेटचा आनंद आपल्या भाषेत घेता येणार आहे.

आर जे आशुतोष, कुणाल दाते आणि सुनील वैद्य आयपीएल सामन्यांचं मराठीतून समालोचन करणार आहेत. तर संदीप पाटील, दीलिप वेंगसरकर, चंद्रकांत पंडीत, हृषिकेश कानिटकर, आणि अविष्कार साळवी ही क्रिकेट तज्ञ मंडळी सामन्यांची रंगत आणखी वाढवणार आहेत.

तेव्हा मराठीतून क्रिकेटचे सामने पाहण्याची ही दुर्मिळ संधी चुकवू नका. नक्की पाहा २३ मार्चचा पहिला सामना आणि दर रविवारी VIVO IPL सायंकाळी सात वाजल्यापासून फक्त स्टार प्रवाहवर.