'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. सध्या मालिकेत रंजक वळण आले आहे.

'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत सध्या राधिका शेतकऱ्यांना मदत निधी देण्यासाठी पत्रकार परीषदेत जाते. शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी जेव्हा ती सुटकेस खोलते तेव्हा त्यात पैशांऐवजी दगडी सापडतात. त्याच्यानंतर राधिकावर उलटसुलट चर्चा होते. दरम्यान राधिकाचा नवरा गुरूनाथ सुभेदारला खूप आनंद होतो आणि तो सर्वांसमोर राधिकाचा अपमान करण्यात यशस्वी होतो.

राधिकाच्या ऑफिसमध्ये शेतकरी राधिकावर पैसे चोरल्याचा आरोप करू लागतात आणि बरीच टीका करू लागतात. हे सगळे ऐकून राधिकाला रडू कोसळते. एकीकडे राधिका मसाले कंपनीची सगळीकडे बदनामी होते. म्हणून राधिका खूप चिंतेत असते.

नुकताच प्रदर्शित करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये या प्रकरणाचा पोलीस तपास करीत असताना ऑफिसचा सुरक्षा रक्षक त्या दिवशी अकरा व साडे अकराच्या दरम्यान दोन जण आले होते. मॉडेल मुलगी आणि तिच्यासोबत एक पुरूष होता. त्यावर मॉडेल मुलगी म्हटल्यावर राधिका म्हणते ती शनाया असेल. पोलीस तिच्या घरी लगेच जाऊन चौकशी करायचा निर्णय घेतात. हे गुरूनाथला समजले तेव्हा शनायाची चौकशी म्हणजे केडीच्या घरी जाणार... बॅग तर केडीच्या घरी असल्याचे प्रोमोमध्ये गुरूनाथ म्हणतो. तर पोलीस शनायाच्या घराची झडती घेत असताना शनाया पोलिसांना बोलते की आमच्याकडे एकपण बॅग नाही.