कार्यक्रमाच्या दुसऱ्या सीझनसाठी महेश मांजरेकर यांनी नुकतंच एक रॅप सॉंग शूट केले आहे जे त्यांनी स्वतः गायले. महेश मांजरेकर यांचा डॅपर लुक आणि विंटेज बीटल रेट्रो गाडीवर बसून त्यांची या रॅप सॉंगमधली एन्ट्री एकदम कडक आहे. या कार्यक्रमाचे अनेक प्रोमोज महेश मांजरेकरांनी शूट केले असून प्रत्येक प्रोमोमध्ये त्यांचा वेगळा अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळतो आहे. कलर्स मराठी वाहिनीने सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी प्रोमो शेअर केला असून या प्रोमोंमधून लोकांना याविषयी हिंट देण्यात आली आहे. एबीपी माझा वृत्त वाहिनीने 'बिग बॉस'च्या घरातील सदस्यांची संभाव्य यादी जाहिर केली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

खरे की खोटे, जिथे सारे मुखवटे... अशांची गोष्ट घेऊन येतोय #BiggBossMarathi2 26 मे संध्या. 7 वा आणि रोज रात्री 9.30 वा. #ColorsMarathi वर आणि @voot वर कधीही. . . Music Composed, Arranged and Produced by @hiteshmodak Assisted by @AkashPrajapati and @varishatanna Rap Performed by: @maheshmanjrekar Additional Vocals: @shatadrukabir , @parryg_thecrazytongue Recorded by @shantanuhudlikar , Abhishek Khandelwal, @manasitare Mixing & Mastering By @shantanuhudlikar Assisted by @manasitare Recorded, Mixed & Mastered at #yashrajstudios

A post shared by Colors Marathi Official Page (@colorsmarathiofficial) on

या यादीत त्यांनी लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर, अभिनेता मिलिंद शिंदे, कवी मनाचे नेते म्हणून प्रचलित असलेले अभिजीत बिचुकले, अभिनेत्री रसिका सुनील, अभिनेता भूषण प्रधान, अभिनेत्री मनवा नाईक, अभिनेत्री केतकी चितळे किंवा गायिका केतकी माटेगांवकर, टिकटॉक गर्ल अभिनेत्री अमृता देशमुख, अभिनेता दिगंबर नाईक, अभिनेत्री सुरभी हांडे, अभिनेत्री प्राजक्ता हनमघर, अभिनेत्री नेहा पेंडसे किंवा नेहा गद्रे किंवा नेहा शितोळे ही नावे चर्चेत आहेत.