सुप्रसिद्ध मालिका 'होणार सून मी या घरची' फेम मराठी अभिनेता मनोज कोल्हटकर आता सोनी एंटरटेनमेंट टेलेव्हीजन वरील सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय मालिका 'ये ऊन दिनो कि बात' या मालिकेमध्ये दिसणार आहेत.  

मनोज लेखक, अभिनेता, व निर्माता देखील आहे. त्यांनी आपल्याअभिनयासोबत नाटकही लिहिले आहे. आपल्या अभिनयाने मराठी सृष्टीत तर नाव मिळवलेच, तसेच त्यानी हिंदी क्षेत्रात हि प्रसिद्धी मिळवली, हल्लीच ते आपल्याला स्टार प्लस वरील 'दिव्य दृष्टी' या मालिकेत दिसले होते, तसेच त्यांनी चंद्रनंदिनी, महादेव, बालगणेश, बाजीराव, इत्यादी अश्या अनेक मालिकेमध्ये काम केले आहे. तसेच सत्याग्रह, अजिंठा इत्यादी चित्रपटातही त्यांनी काम केले आहे.

आमच्या सूत्रांनुसार, मनोज हे हिंदी सोनी टीव्ही वरील प्रसिद्ध मालिका 'ये ऊन दिनो कि बात' मध्ये नयना आणि समीर च्या शेजारी श्री गडकरी, जे आपल्याला निवृत्त पत्रकाराची भूमिका निभावताना दिसणार आहेत. त्यांच्या बरोबर 'क्या हाल मिस्टर पांचाळ' फेम कंचन गुप्ता सुद्धा ह्या मालिकेमध्ये सामील होणार आहेत, व कंचन ह्यांना प्रीतीची सासू म्हणून पाहिले जाईल.

आम्हांला त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची टिप्पणी मिळालेली नाही आहे.