रात्रीस खेळ चाले' मालिकेच्या दुसऱ्या पर्वाने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच शिगेला पोहोचवली असून, मालिकेच्या पुढच्या भागात नेमकं होणार तरी काय याचच कुतूहल अनेकांमध्ये पाहायला मिळतं. मालिकेच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांनी जसा भरभरून प्रतिसाद दिला तसंच या २ भागावर देखील प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. याचं बहुतांश श्रेय हे मालिकेतील कलाकारांनाही जातं. मुख्य म्हणजे 'रात्रीस खेळ चाले २', मधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष दाद मिळत आहे.

या मालिकेने नुकतंच १०० भागांचा पल्ला गाठला. या यशस्वी शतकाचा आनंद संपूर्ण टीमने सेटवर केक कापून साजरा केला. यावेळी रात्रीस खेळ चाले २ मालिकेची संपूर्ण टीम सेटवर उपस्थित होती. संपूर्ण टीम जिच्यामुळे हि मालिका यशस्वीरित्या १०० भाग पूर्ण करू शकली त्यांचे आभार मानले गेले. सेटवर केक कापून आनंद साजरा केला आणि या यशाच्यामागे असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तो भरवला. कार्यक्रमावर प्रेक्षकांचे निस्सीम प्रेम आहे आणि ते त्याला पाठिंबा देत आहेत यात काही शंका नाही.

कलाकारांनी सांगितले की कार्यक्रमाविषयी आणि त्यातील लाडक्या पात्रांसाठी चाहत्यांकडून त्यांना नेहमीच सकारात्मक आणि चांगला प्रतिसाद मिळत आहे. नुकतंच मालिकेत काशीचा अपघाती मृत्य झाला आहे. आता यापुढे काय होणार? वच्छी काशीचा मृत्यू मान्य करणार का? अण्णांना भिवरी आणि तातू सारखं काशीचं अस्तित्व जाणवणार का? हे प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळेल.