मीरा जोशी आणि रोहन गुजर चा एक फोटो सगळी कडे वेगांने पसरत होता. मीरा व रोहन दोघं रिलेंशनशिप मध्ये आहेत कि काय असा अंदाज ही लावण्यात येत होता.

मीरा जोशी

ह्या फोटो मध्ये रोहन मीरा किस करतांना बघून सगळी कडे चर्चचे वादळच पसरले. पण नुकतेच मीरा ने तिच्या इंस्टाग्राम वर एक स्टोरी अपलोड केली होती ज्या मध्ये "रोहन व माझे नवीन गाणे आज रिलीज करण्यात येत आहे" असे सांगत सगळ्यांचेच गैरसमज दूर केले.

 मराठी अभिनेत्री मीरा जोशीचे "तुझ्या उराच्या घरट्यामध्ये" नावाचे  गाणे रिलीज झगले ह्या   गाण्याच्या सुरुवातीस मीरा तिच्या वडिलांसाठी पत्र लिहते . आणि त्या पत्रावर एक मोरपंख ही ठेवून घरातून पळून जातांना दाखवली आहे.  ह्या गाण्याचे दिग्दर्शन गौरव व निखिल यांनी केले आहे तसेच ह्या गाण्याचे गायन शंकर महादेवन ह्यांनी केले आहे. निलेश मोहिर यांनी ह्या गाण्याला  संगीत दिले असून, गाण्याचे लेखन विंदाकरंदीकरांनी  केले आहे.   तसेच ह्या गाण्यात मीरा जोशी आणि तिची तिच्या वडिलांसाठी असलेली ओढही मनाला भावुक करून जाणारी आहे.

"तुझ्या उराच्या घरट्या मध्ये" ह्या गाण्यात मीरा जोशी आणि रोहन गुजरची एक वेगळीच रोमँटिक  केमेस्ट्री दिसून येत आहे.  आणि ही केमेस्ट्री तुम्हाला नक्कीच आवडेल.