तुला पाहते रे’ ही वय विसरायला लावणारी जगावेगळी प्रेम कहाणी झी मराठी वाहिनी प्रेक्षकांसाठी घेऊन आली. अवघ्या काही दिवसातच या मालिकेने प्रेक्षकांची मनात वेगळी जागा निर्माण केली आणि त्याच सोबत मराठी टीव्ही इंडस्ट्री ला मिळाली एक नवीन अभिनेत्री ती म्हणजे "गायत्री दातार".

Gayatri datar

मूळची पुण्यातील असलेल्या गायत्रीने या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. करिअरच्या या पहिल्याच संधीचं तिनं पूर्णपणे सोनं केलं आहे असं म्हणता येईल. मालिकेत ती साकारणारी ईशा निमकर मध्यमवर्गीय कुटुंबात राहणारी अत्यंत साधी मुलगी आहे. जिला पूर्ण जग हे चांगलंच आहे असं वाटत तसेच ती खूप भोळी निरागस आहे गोंधळलेली आहे पण खऱ्या आयुष्यातील
गायत्री हि पूर्णतः वेगळी आहे.

गायत्री
कोयना नदीत रिव्हर राफ्टिंग

खऱ्या आयुष्यात गायत्री बिंदास बोल्ड आणि खूप धाडसी आहे. तिला फिरण्याची आणि ट्रेकिंगची खूप आवड आहे. मनालीमध्ये ट्रेकिंग, कोयना नदीत रिव्हर राफ्टिंग, लेह लडाखची भटकंती हे तिचे आवडते छंद आहेत आणि त्याबाबतचे बरेच फोटो गायत्रीने सोशल मीडियावर शेअर करत असते. मालिकेतली ईशा जरी सतत घाबरलेली गोंधळलेली आणि संभ्रमावस्थेत दिसत असली तरी गायत्री खऱ्या आयुष्यात बिंदास बोल्ड आणि स्पष्टवक्ती आहे. त्यामुळे जस दिसत तस नसत असच तिला बघून म्हणावं लागेल. गायत्रीने अत्यंत कमी वेळात प्रेक्षकांच्या हृदयात स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे.या मालिकेमुळे तिच्यावर प्रेमाचा वर्षाव होत आहे.

Gayatri datar