प्रत्‍येकाला आपल्‍या आवडत्‍या पदार्थाचा आस्‍वाद घ्‍यायला आवडतो. पण 'बिग बॉस' घरामध्‍ये असलेल्‍या स्‍पर्धकांना ही संधी मिळत नाही. त्‍यांची ही आवड पूर्ण करण्‍याचा मार्ग म्‍हणजे फक्‍त त्‍याबाबत गप्‍पा करणे. वूटच्‍या 'अनसीन अनदेखा'च्‍या नवीन क्लिपमध्‍ये वीणा जगताप किशोरी शहाणेला केकसाठी असलेल्‍या तिच्‍या आवडीबाबत सांगताना दिसत आहे. या दोघीही बेडरूममध्‍ये गप्‍पा मारत आहेत. किशोरी वीणाचे ती किती सुंदर दिसते आणि तंदुरूस्‍त आहे यासाठी कौतुक करते. वीणा त्‍यावर म्‍हणते, ''अॅक्‍च्‍युअली नाही आहे बारीक मी. २ महिने मी घरी बसून फक्‍त जंक फूड खाल्‍लं आहे, बेकरी प्रॉडक्‍ट्स आणि स्‍पेशली केक्‍स मला खूप आवडतात. जॅम रोल्‍स, स्विस रोल्‍स, केक्‍स, पेस्‍ट्रीज आणि बनाना अॅप्रीकोट केक तर मला खूपच टेम्‍प्‍ट करतात.''  

वीणा व किशोरी

ती पुढे म्‍हणते, ''मी, मम्‍मा आणि माझी बहीण आम्‍ही उल्‍हासनगरला गेलो ना की नक्‍की केक खातो, इव्‍हन कधी इच्‍छा झाली तर घरी केक मागवतो आणि खातो.''

किेशोरी लगेच यासंदर्भात म्‍हणते, ''मी पण कधी तरी असंच करते, डिनरच्‍या ऐवजी केक, केक फीस्‍ट. बॉबी सेलिब्रेशनच्‍या वेळी ऑर्डर करतो असं सगळं, टू हॅव्‍ह समथिंग डिफरण्‍ट आणि मला बेसिक न्‍यूट्रिशन मिळाला की बसं होतं पण ओकेजनली असं सगळं खायला मिळालं तर व्‍हाय नॉट!''

बिग बॉस वीणा व किशोरी

आम्‍ही आशा करतो की, बिग बॉस वीणा व किशोरीच्‍या विनंतीला ऐकत असेल आणि लवकरच त्‍यांना अनेक केक्‍सची ट्रिट देईल.

तुमच्‍या आवडत्‍या स्‍पर्धकांच्‍या आवडत्‍या व न आवडत्‍या गोष्‍टींबाबत जाणून घ्‍या फक्‍त वूटच्‍या 'अनसीन अनदेखा'मध्‍ये!

 

1100x470_AP_Tellychakkar_Bottom_widget_Marathi