कपड्यांचे वेड असणे ही अगदी सर्वसामान्य बाब आहे. आपल्या भल्या मोठ्या वॉर्डरॉबमध्ये लोक आपल्या आवडीचे खूप पोशाख जमा करून ठेवत असतात. पण या आवडीच्या बाबतीत अबीर सूफीने एक पाऊल आणखी पुढे टाकले आहे. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील मेरे साई- श्रद्धा और सबुरी या मालिकेत अबीरचा पोशाख अगदी ठराविक आहे- एक पांढर्‍या रंगाचा पायघोळ अंगरखा आणि कफनी, जे मालिकेच्या प्रत्येक दृश्यात दिसते. पण एक गंमतीशीर गोष्ट ही आहे की, तो दर दिवशी जे पोशाख घालतो आहे, ते आपल्या परीने विशेष आहेत.

मेरे साई या भारताच्या लोकप्रिय मालिकेने देशाला साई भक्तीच्या रंगात रंगवले आहे आणि दिवसेंदिवस मालिकेच्या चहत्याची संख्या वाढतच चालली आहे. साईंची भूमिका अत्यंत सुंदर साकारणार्‍या अबीर सूफीला प्रेक्षकांचे खूप कौतुक आणि प्रेम मिळत आहे. प्रेक्षकांना अबीर नेहमी पंधरा पायघोळ अंगरखा आणि कफनी या एकाच पोषाखात दिसत असला तरी बर्‍याच लोकांना हे माहीत नसेल की, त्याच्याकडे सुमारे 93 पोषाखांचा संग्रह आहे. त्यामुळे दररोज त्याचा एकसारखा दिसणारा लुक देखील विशेष असा असतो. शिवाय उन्हाळा चालू असल्याने अबीरला गर्मीतच काम करावे लागते आहे, ज्यामुळे एकच पोशाख त्याला संपूर्ण दिवस वापरता येत नाही. त्यामुळे प्रॉडक्शन टीमने त्या पात्रासाठी एकाच प्रकारच्या पोषाखांचा संग्रह करण्याचे ठरवले. त्यामुळे शूटिंग चालू असताना तो पोशाख बदलू शकतो. आणि गर्मीने व घामाने भिजलेल्या कपड्यांतच त्याला वावरावे लागत नाही आणि पोषाखातील एकसारखेपणा देखील कायम राखता येतो.

याबद्दल अधिक माहिती देताना अबीरने पुष्टी केली, “या भयंकर उन्हाळ्यात आख्खा दिवस एकाच पोषाखात चित्रीकरण करणे मला अवघड होऊ लागले होते. माझी जवळजवळ सर्व दृश्ये आउटडोर आहेत आणि उन्हाळ्यामुळे मला घाम येऊन कपडे बिघडून दृश्य बिघडायची शक्यता होती. ह्याच कारणामुळे मला दिवसातून अनेक वेळा कपडे बदलावे लागतात. आणि त्यासाठी माझ्या पोषाखाचे किमान 10 सेट आमच्या सेटवर तयार ठेवण्यात येतात. अशाप्रकारे आता माझ्याकडे साई बाबांच्या पात्राचे एकसारखे 93 पोशाख आहेत.”

बघा मेरे साई, सायंकाळी 6:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर