तरुणींच्या स्वप्नांतला प्रिन्स चार्मिंग म्हणजेच अभिजीत आमकर सध्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

तरुणींच्या स्वप्नांतला प्रिन्स चार्मिंग म्हणजेच अभिजीत आमकर सध्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 'टकाटक' या आगामी चित्रपटातून अभिजीत मुलींचा घायाळ करायला सज्ज आहे. सोज्वळ, प्रेमळ आणि समंजस भूमिकांद्वारे घराघरांत पोहचलेल्या अभिजीतने आत्तापर्यंत 'माझे मन तुझे झाले', 'अरे वेड्या मना', 'नकटीच्या लग्नाला यायचं हं', 'तुझ्यावाचून करमेना' या मालिकांतून तर 'एक सांगायचंय!' या मल्टीस्टारर मराठी चित्रपटातून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सध्या तो बऱ्याच दिवसांनी मोठ्या पडद्यावर झळकणार असून येत्या २८ जूनला प्रदर्शित होणाऱ्या 'टकाटक' या एडल्ट कॉमेडी चित्रपटात एका लग्नाळू तरुणाच्या भूमिकेत दिसणार आहे.     

अभिजीत

सतत एकाच साच्यात काम करताना कलाकार अडकून जातात. सर्वांग विकासासाठी प्रत्येक कलाकार हा साचेबद्धपणा मोडून काढायचा प्रयत्न करतात. अशीच एक संधी अभिजीतच्या वाटेस टकाटक चित्रपटाद्वारे चालून आली आणि अभिजितने हे चॅलेंज स्विकारलं.

अभिजीत

टकाटक' हा अनडाऊटेडली एडल्ट कॉमेडी आहे पण विश्वास ठेवा हा केवळ थिल्लरपणा नसून ह्यातून एक सोशल मेसेज देण्यात आलेला आहे. असं अभिजीतने प्रेक्षकांच्या प्रेमळ प्रतिक्रियांना उत्तर देताना सांगितलं. दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी माझ्यावर विश्वास दाखवत हे इमेज ब्रेकिंग कॅरेक्टर मला करू दिलं याबद्दल त्यांचा मी खूप ऋणी असल्याचं तो सांगतो. 

अभिजीत

 अभिजित आमकर, प्रथमेश परब यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असणारा 'टकाटक' लवकरच म्हणजे २८ जूनला प्रदर्शित होत असून सध्या चित्रपटाचा ट्रेलर सध्या सर्व सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

अभिजीत

भरपूर मनोरंजनासोबत एक सोशल संदेश देणारा 'टकाटक' प्रेक्षकांना मनमुराद आनंद देईल यात काही शंका नाही.