आनंदाची झलक, आनंदाचा आस्वाद, आणि आनंदाच्या क्षणांनी आपल्या ओठांवर येणारी छोटीशी झलक म्हणजे स्माईल, आणि 'स्माईल' आपल्या आरोग्यासाठी खुप चांगली असते, म्हणूनच विक्रम फडणीस दिग्दर्शित 'स्माईल प्लिज' हा नवीन मराठी चित्रपट तुमच्या भेटीला येतो आहे, नुकताच 'स्माईल प्लिज' चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित झाला आहे.

मराठीसिनेसृष्टीतील 'मुंबई पुणे मुंबई' फेम मुक्ता बर्वे, 'जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतील हँडसम हंक ललित प्रभाकर, आणि मराठी क्षेत्रातील सुप्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओक 'स्माईल प्लिज' या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याच्या अभिनयाने तर या चित्रपटाला चाँद चाँद लागणार आहे.

मुक्ता बर्वे आणि ललित प्रभाकर म्हणत आहेत 'स्माईल प्लिज' म्हणजचे हास्याची डबल धमाल असणार आहे. ह्या पोस्टरमध्ये मुक्ता आणि ललित यांच्या चेहऱ्यावरची स्माईल, आणि हि युनिक जोडी बघून तर, असे वाटत आहे कि, आपल्याला काहीतरी नवीन बघायला मिळणार आहे.

मुक्ता बर्वे आणि ललित प्रभाकर घेऊन येणार आहेत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक सूंदर हास्य,  '१९ जुलै'ला  'स्माईल प्लीज' लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे चित्रपगृहात... तर मग बघायला विसरू नका, आणि स्माईल द्यायला तर अजिबात विसरू नका... म्हणूनच 'स्माईल प्लीज'.