छोटा पडदा असो किंवा मोठा पडदा पल्लवीने नेहमीच दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत.

पल्लवी सुभाष

पल्लवी सुभाषचा आज म्हणजेच ९ जूनला वाढदिवस असून तिचा जन्म मुंबईतील आहे. अभिनेत्री पल्लवी सुभाषने अनेक मराठी, हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये तसेच जाहिरातींमध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे. छोटा पडदा असो किंवा मोठा पडदा पल्लवीने नेहमीच दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. स्वत:च्या वेगळ्या अभिनयाची मोहोर तिने चित्रपटसृष्टीत उमटविली आहे.

पल्लवी सुभाष

'चक्रवर्ती अशोक सम्राट' या मालिकेमध्ये पल्लवीने साकारलेल्या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले होते. त्याचप्रमाणे 'गोद भराई', 'बसेरा', 'आठवा वचन', 'तुम्हारी दिशा' यांसारख्या अनेक मालिकांमध्ये देखील तिने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. पल्लवीने साऊथ चित्रपटसृष्टीत देखील काम केले असून तेलुगू भाषेतील एका सिनेमातही ती झळकली आहे. आयुष्मान खुरानाचा 'विकी डोनर' हा चित्रपट चांगलाच गाजला होता. याच चित्रपटाच्या तेलुगू रिमेकमध्ये पल्लवीने प्रमुख भूमिका साकारली होती.

पल्लवी सुभाष

पल्लवी आणि अभिनेता अनिकेत विश्वासरावचे अफेअर एकेकाळी चांगलेच गाजले होते. ते दोघे जवळजवळ आठ वर्षं नात्यात होते. पण काही वर्षांपूर्वी त्यांनी ब्रेकअप केले. याविषयी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना पल्लवीने सांगितले होते की, आम्ही दोघे वेगळे झालो आहोत हे खरे आहे. आम्ही दोघांनी मिळून काही महिन्यांपूर्वी हा निर्णय घेतला. ही आमची खाजगी बाब असल्याने आमच्या ब्रेकअपचे कारण काय आहे हे मी सांगू इच्छित नाही. एखादी गोष्ट तुमच्यासाठी चांगली आहे असे तुम्हाला वाटत असते. पण काही वर्षांनंतर ती गोष्ट तुमच्यासाठी योग्य नाही याची तुम्हाला जाणीव होते. ब्रेकअप हे कधीच सोपे नसते. त्यामुळे मी माझ्या आयुष्यातील अतिशय वाईट परिस्थितीतून जात आहे. पण माझ्या कामामुळे मला या सगळ्या गोष्टींचा विचार करायला देखील वेळ मिळत नाहीये. आम्ही दोघेही मॅच्युअर्ड असून दोघांचे चांगले व्हावे असाच नेहमी विचार करतो. त्यामुळे एकमेकांशी न बोलण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही. आम्ही दोघे एकमेकांचे नेहमीच फ्रेंड्स राहाणार आहोत.

अनिकेत विश्वासरावने काही महिन्यांपूर्वी स्नेहा चव्हाण या अभिनेत्रीसोबत लग्न केले तर पल्लवी आजही सिंगल आहे.