हिन्दी चित्रपट दुनियेमध्ये शोमन म्हणून प्रख्यात असलेल्या सुभाष घई यांनी त्यांच्या ,मुक्ता आर्टस् लि.तर्फ सन ई चौघडे वळू आणि समिता   या तीन मराठी चित्रपटांची निर्मिती केली होती. समिता या चित्रपटाला तर राष्टीय पुरस्कारही मिळालेला होता. आता सुभाष घ ई त्यांच्या मुक्ता आर्टस् लि.तर्फ ,विजेता , या नव्या मराठी चित्रपटाची निर्मिती करीत आहेत. गोवा येथे सुरु असलेल्या ,मराठी चित्रपट  महोत्सवामध्ये या चित्रपटाचं प्रथम पोस्टर लाँचिंगचे अनावरण गोव्याचे सांस्कुतिक आणि कला मंत्री  गोविंद गावडे यांच्या हस्ते करण्यात आले.

vijeta

खेळाची पार्श्वभूमी असलेला हा चित्रपट पोस्टरवरूनच प्रेक्षकांची उत्सुकता वाढविणारा आहे.हे लक्षांत येत.

सुभाष घई

 येत्या आँगस्ट महिन्यापासून या चित्रपटाचं शूटिंग सुरू होत असून पुढील वर्षीच्या चोवीस जानेवारीला तो प्रदर्शित करण्याचा सुभाष घ ईंचा विचार आहे.या चित्रपटाचे लेखक,दिग्दर्शक अमोल शेटगे आहेत.निर्माते राहुल पुरी ,सहनिर्माते सुरेश पै ,छायालेखक उदयसिंह मोहिते संगीत रोहन रोहन आणि संकलक आशिष म्हात्रे आहेत.

s

या चित्रपटात मोठमोठे नामांकित कलावंत काम करत आहेत. ज्यामध्ये सुबोध भावे,पुजा सावंत,नेहा महाजन,पुजा बिश्त,माधव देवचुके,देवेन्द्र चौगुले,गौरीश शिपुरकर,सुशांत शेलार,मानसी कुलकर्णी,क्रुतिका तुलसकर,ललित सावंत आणि दिप्ती धोत्रे या कलावंतांचा समावेश आहे.

गोवा मराठी चित्रपट महोत्सव

या चित्रपटाचं प्राँडक्शन डिझायनर सुनिल निगवेकर असून जाहिरात संकल्पना साकेत शिकांत यांची आहे.या चित्रपटाचे पी आर ओ प्रद्ना शेट्टी आणि प्रेम झिंगनानी हे आहेत.तर सहाय्यक दिग्दर्शक महेश पावसकर हे आहेत.