आपल्या बिझी शेड्यूलमधून स्वत:साठी वेळ काढून प्राजक्ता युरोप टूर एन्जॉय करताना दिसतेय. पण तिने शेअर केलेल्या काही फोटोंमुळे तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तिने एका मुलासोबत तिचे काही फोटो शेअर केले असून "युरोपच्या गल्यांमध्ये रोमॅंटीक फोटोज नाही काढले तर मग काय फायदा" असे लिहिले आहे. त्यामुळे तिच्यासोबत असलेला हा मुलगा कोण आहे असा तिच्या चाहत्यांना प्रश्न पडला आहे. या फोटोवरून सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. पण या फोटोच्या खाली असलेले कॅप्शन वाचले तर या मुलाचे आणि प्राजक्ताचे नाते काय हे लगेचच लक्षात येत आहे.

प्राजक्ता माळी

प्राजक्ताने या फोटोच्या कॅप्शनमध्ये हा मुलगा कोण आहे हे सांगितले आहे. हे कॅप्शन वाचल्यानंतर या मुलाला ती ब्रो अशी हाक मारत असल्याचे आपल्या लक्षात येत आहे. त्यामुळे तिच्यासोबत असलेला हा मुलगा दुसरा कोणीही नसून तिचा भाऊ आहे हे आपल्याला कळत आहे. तिने फोटोसोबत लिहिले आहे की, माझे खूप सारे फोटो काढल्याबद्दल आणि माझ्यासोबत तू खूप फोटो काढल्याबद्दल मी तुझी आभारी आहे. भावा... तू ही गोष्ट खूपच चांगल्याप्रकारे केलीस आणि तुझे नाव खूपच कुल आहे. छत्रपाल... जसा आहेस तसाच कायम राहा.

प्राजक्ता माळी