आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारा मराठमोळा अभिनेता म्हणजे पुष्कर श्रोत्री. आपला अभिनय, कॉमेडीचं अफलातून टायमिंग यामुळे तो रसिकांचा लाडका अभिनेता बनला आहे. सिनेमासोबतच पुष्कर मालिका आणि नाटकांमध्येही तितकाच बिझी असतो.  नुकतेच पुष्करने आपल्या बिझी शेड्युअलमधून वेळ काढून आपल्या कुटुंबासह क्वॉलिटी टाईम एन्जॉय केला. त्यासाठी त्याने थायलँडची निवड केली होती.

पुष्कर श्रोत्री

पुष्करच्या थायलँडमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतानाचे फोटो शेअर करताच फॅन्स आणि मित्रपरिवाराकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. नेहमीचं शूटिंगचं बिझी शेड्युलपासून वेळ काढत पुष्कर कुटुंबासह हॉलीडेचा आनंद घेतल्याचे त्याच्या या फोटोत पाहायला मिळतंय. खुद्द पुष्करनेच त्यांचे या व्हॅकेशनचे फोटो सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. संपूर्ण कुटुंबासह पुष्कर बँकॉक, क्राबी अशा वेगवेगळ्या ठिकाणांवर  फोटो काढण्याचा आनंद लुटताना पाहायला मिळतंय.

पुष्कर श्रोत्री

पुष्करने अभिनयासोबत नुकतेच त्याने सुरु केलेली मराठी सिनेदिग्दर्शक आणि निर्माता ही इनिंगही यशस्वी ठरली आहे. त्याने निर्मिती आणि दिग्दर्शित केलेल्या 'उबुंटू' या मराठी चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.