‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा पुरस्कार सोहळा १४ जून २०१९ रोजी सायंकाळी ०६.३० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदे’चे पुरस्कार नुकतेच जाहीर झाले असून कमलाकर नाडकर्णी आणि दया डोंगरे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार सोहळा १४ जून २०१९ रोजी सायंकाळी ०६.३० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. दरवर्षी ‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद’ रंगकर्मींना नाटककार गोविंद बल्लाळ देवल स्मृतिदिनाप्रित्यर्थ १४ जून रोजी पुरस्कार देऊन सन्मानित करते.