पाऊस प्रत्येकालाच हवाहवासा वाटतो. विशेषतः प्रचंड उकाड्यानंतर पाऊसधारा कधी बरसणार याची प्रत्येकजण चातकाप्रमाणे वाट पाहत असतो. त्यातच पहिल्या पावसाची मजा काही औरच असते. पहिला पाऊस, त्यानंतर येणारा मातीचा सुगंध प्रत्येकाला वेगळाच आनंद देऊन जातो. सर्वसामान्यांप्रमाणे सेलिब्रिटी मंडळीही पहिल्या पावसाचा आनंद घेतात. अभिनेत्री स्पृहा जोशी हिनंही पहिल्या पावसाचा आनंद घेतला.

स्पृहा जोशी

आपल्या घराच्या खिडकीतून पहिल्या पाऊसधारांचा आनंद घेत असल्याचा फोटो स्पृहाने सोशल मीडियावर शेअर केला आहे.