मराठी ब्लॉकबस्टर चित्रपट 'सैराट' मध्ये तिने साकारलेल्या भूमिकेबद्दल रिंकू राजगुरू यांना प्रामुख्याने ओळखले जाते. एका खऱ्या कथेवर आधारित असलेला हा हिट चित्रपट नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केला होता. ज्यात रिंकूने आर्चीची प्रमुख भूमिका साकारली होती.

या चित्रपटाने एका रात्रीत तिला नवीन ओळख मिळवून दिली. प्रेक्षकांनी तिच्या या कामाबद्दल कौतुक केले. या अभिनेत्रीबद्दलच्या काही माहीत नसलेल्या गोष्टी जाणून घेऊया.

 

 

रिंकू आणि तिचे कुटुंब
रिंकू आणि तिचे कुटुंब

 

रिंकू अशा घराण्यातून आहे, ज्यात तिचे पालक एक माध्यमिक शिक्षक आहेत. तिच्या बालपणापासूनच दोघेही काम करीत असल्याने, रिंकू आत्मनिर्भर आणि खूप केंद्रित आहे. एखादी गोष्ट करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ती गोष्ट पूर्ण होईपर्यंत ती आपले लक्ष विचलित करत नाही, असे तिचे वडील एका मुलाखतीत म्हणाले.

 

 

rinku-dance3
रिंकूची नृत्याविषयी आवड

 

प्रसिद्ध 'सैराट' अभिनेत्री डान्स प्रेमी आहे. ती 2 वर्षांची होती तेव्हा तिने कुठल्याही मार्गदर्शनाशिवाय नृत्य सादर केले आणि सर्वांनी त्याची प्रशंसा केली. तेव्हापासून ते अगदी शाळा / महाविद्यालयापर्यंत नृत्यात भाग घेत आलीय. तिने कोणतेही व्यावसायिक नृत्य प्रशिक्षण घेतलेले नसतानाही ती खूप छान नृत्य करते. 'सैराट' च्या ऑडिशनवेळी सुद्धा तिला प्रथम नृत्य करण्याबद्दल विचारले गेले होते.

 

 

rinku-singing4
रिंकुला गाणे गायला आवडते

 

होय, आपण म्हणू शकतो की ती खरोखर एक उत्तम अभिनेत्री आहे. त्याचबरोबर ती गातेही उत्तम. रिंकूचा आवाज गोड आहे. तिचे आजोबा वेगवेगळी वाद्ये वाजवित असत आणि त्यांचा कडूनच तिला गायनाची देणगी मिळाली. तिचे आजोबा वाद्ये वाजवताना, ती गात असे पण तिने कधीच गायन गंभीरतेने घेतले नाही.

 

 

rinku-bike5
रिंकूचे मराठीत पदार्पण

 

रिंकू सातवीत असताना तिने 'सैराट' या चित्रपटासाठी ऑडिशन दिले होते. पण या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री म्हणून निवड होण्यासाठी एक वर्षाचा काळ जावा लागला. ती नववीत असताना चित्रपटाची शूटिंग सुरू झाली होती आणि यामुळे तिला शाळेपासून एक वर्ष दूर रहावे लागले होते.

 

 

rinku7

 

rinku6