मराठी चित्रपटसृष्टीतला हँडसम गश्मीर महाजनीने आपल्या अभिनयानं मोठा पडदा गाजवल्यानंतर त्याने त्याचा मोर्चा काही मालिकांकडेही वळवला होता. त्यामुळे त्याची लोकप्रियता वाढली आहे. याच कारणामुळे त्याचा प्रत्येक चाहता त्याच्याविषयी जाणून घेण्यास उत्सुक असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असतो. आपल्या जीवनातील सुखद क्षण, फोटो तो सोशल मीडियावर शेअर करत असतो.

गश्मीर महाजनी

नुकताच त्याने एक फोटो शेअर केले आहे.या फोटोत गश्मीर आपल्या बाळासोबत खेळत असल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळी बापच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत आहे. मॉर्निंग रिच्युअल्स म्हणजेच सकाळचा दिनक्रम अशी प्रतिक्रिया त्याने या फोटोसह दिली आहे.

gashmeer mahajan

 या फोटोवर गश्मीरच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव सुरू आहे. गश्मीर महाजनी आणि त्याची पत्नी गौरी देशमुख यांच्या जीवनात २१ डिसेंबरला नव्या पाहुण्याचे आगमन झालं. पिता झाल्यामुळे जबाबदारी आणखी वाढल्याचंही गश्मीरने म्हटले होते.

sf