चला हवा येऊ द्या फेम अभिनेता कुशल भद्रिके आपल्या अभिनयाच्या टाईमिंग आणि भन्नाट विनोदांनी  सगळ्यांना हसवत असतो. चला हवा येऊ द्या हा एक कॉमेडी शो असून ह्या विनोदी कार्यक्रमाने अल्पावधी वेळेतच सगळ्यांच्या मनात घर केले. त्यात कुशल, दुनियादारीतला  "मेहुणे मेहुणे मेहुण्यांचे पाहुणे"चा डायिलोग असो किंवा साडी घालून आजी किंवा सासूच्या भूमिका असूदेत  तो त्याचे सगळेच पात्र अश्या प्रकारे प्रेक्षकांच्या सामोर ठेवतो कि प्रेक्षकांच्या हास्याचा कल्लोळाचं उडतो.

कुशल भद्रिके

तसा कुशल नेहमीच आपल्या उत्तम अभिनयासाठी चर्चेत असतो. पण सध्या तो चर्चेचा विषय ठरतोय ते एका वेगळ्याच कारणासाठी. नुकतेच कुशलने रॉसा बेला मध्ये स्वतःचे नवीन घर विकत घेतले. त्याच्या ह्या आनंदात कुशलची खास मैत्रीण आणि मराठी इंडस्ट्री मधील कॉमेडी क्वीन व चला हवा येऊ द्या मध्ये कुशल सोबत काम करणारी श्रेया बागुडे ही उपस्थित होती. ही बातमी श्रेया ने तिच्या सोशल मीडिया वर ही शेअर केली.